![]()
कुर्डुवाडी शहर आणि परिसरातून जाणाऱ्या महामार्गांवर रक्ताचे सडे पडत आहेत. अपघातानंतरच्या अत्यंत महत्त्वाच्या ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींना जीवदान मिळणे अपेक्षित असताना, कुर्डुवाडीत कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले ‘ट्रॉमा केअर सेंटर’ केवळ प्रशासकीय उदासीनतेचा नमुना ठरत आहे. इमारत सज्ज आहे, पण ती केवळ शोभेची वास्तू बनली असून जखमींना आजही सोलापूर किंवा बार्शीची वाट धरावी लागत आहे. राज्य शासनाने ७ कोटी २३ लाख रुपयांच्या निधीतून या सेंटरला मंजुरी दिली होती. २९ डिसेंबर २०२१ रोजी काम सुरू झाले आणि आता इमारत पूर्ण होऊन दोन वर्षे उलटली आहेत. या ठिकाणी २० खाटांचे दोन स्वतंत्र वॉर्ड, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, एक्स-रे विभाग अशा सुविधा कागदावर अतिशय भव्य आहेत, मात्र प्रत्यक्षात या सुसज्ज इमारतीचे टाळे उघडलेच नाहीत. केवळ भिंती उभारून उपचार होत नाहीत, त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असते. जिल्हा शल्य चिकित्सकांनी २० कर्मचाऱ्यांच्या पद निर्मितीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. मात्र, मंत्रालयात या प्रस्तावाला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. जोपर्यंत या पदांना मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत ही इमारत सर्वसामान्यांसाठी कुचकामीच ठरणार आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे आणि आमदार नारायण पाटील यांनी या केंद्रासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. प्रशासकीय मान्यता मिळवून इमारत उभी राहिली, मात्र आता शेवटच्या टप्प्यात पदनिर्मिती आणि उपकरणे मिळवण्यासाठी पुन्हा एकदा मोठ्या राजकीय ताकदीची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. . साहित्याचा अभाव: इमारतीचे काम पूर्ण झाले असले तरी, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची अद्याप प्रतीक्षाच आहे. . डॉक्टरांची कमतरता: तज्ज्ञ डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ नसल्याने उपचाराची यंत्रणा पूर्णपणे ठप्प आहे. . रुग्णांचे हाल: गंभीर जखमींना ८० ते १०० किमी दूर सोलापूरला नेईपर्यंत अनेकांचा श्वास वाटेतच थांबत आहे. ^जर कोट्यवधी रुपये खर्च करूनही आम्हाला खाजगी रुग्णालयात जावे लागत असेल, तर या सरकारी इमारतीचा उपयोग काय, ही इमारत केवळ नेत्यांच्या नावाच्या पाटीसाठी उभी केली आहे का. नागेश शिंदे, नागरिक . ट्रॉमा केअर सेंटरमध्ये त्वरित अत्याधुनिक वैद्यकीय साहित्य पुरवावे. . तज्ज्ञ डॉक्टरांची कायमस्वरूपी नियुक्ती व्हावी. . हे सेंटर २४ तास कार्यान्वित करून सेवा सुरू करावी. इमारतीचे काम पूर्ण झालेतरी यंत्रणेचा ब्लॅक स्पॉट अद्याप त्याला मंजुरी आलेली नाही ^बिल्डिंग ताब्यात घेण्यापूर्वी फायर ऑडिट आवश्यक असते. त्यासाठी पाण्याची टाकी बांधण्याचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. ते पूर्ण होताच बिल्डिंग ताब्यात मिळेल. पदभरतीचा प्रस्ताव, ज्यात अस्थिरोगतज्ज्ञ व भूलतज्ज्ञांची मागणी आहे, तो मंत्रालयात उच्च स्तरीय समितीकडे पाठविलेला आहे. अद्याप त्याला मंजुरी आलेली नाही. डॉ. सुनंदा गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय कुर्डुवाडी) प्रशासकीय पेच, उपाय
Source link
कुर्डुवाडीचे ट्रॉमा केअर व्हेंटिलेटरवर:सात कोटींची इमारत पडली धूळखात, 2 वर्षांपासून रंगरंगोटी पूर्ण, पण ना डॉक्टर ना उपकरणे