Headlines

'खासदार झाले, आता पुढचा नंबर आमदारांचा':भाजप नेते नारायण राणेंचे मोठे विधान; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत काय म्हणाले राणे?




शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि ठाकरे गटाला पुन्हा एकदा बंडखोरीला सामोरे जावे लागले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सावध भूमिका घेत आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला देखील काही आमदारांची अनुपस्थिती होती. यावरून पुन्हा उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या असून आता यात भाजप नेते नारायण राणे यांनी मोठे विधान करत म्हटले, खासदार गेले आता आमदारही फुटू शकतात. सर्व टायगर भाजपमध्ये आले नारायण राणे म्हणाले, ऑपरेशन झाले ना, सहा खासदार इकडून तिकडे गेले. आमचा हेतू साध्या झाला, कुठून काय कोणी केले कशाला काढता? हे सर्व लोकशाहीसाठी धोकादायक आहे की नाही हे परिस्थितीनुसार कळेल. सर्व टायगर भाजपमध्ये आले. ठाकरेंकडे आमदार आहेत कुठे? सध्या तरी त्यांच्याकडे तीनच खासदार आहेत, ते काही उद्धव ठाकरेंना सोडणार नाहीत. त्यांना आम्ही भाजपमध्ये घेणार नाही. आम्ही माणूस बघून घेतो. बाळासाहेबांची मला आठवण येते पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, पुढचा नंबर आमदारांचा लागेल. खासदारांना जो काही मोबदला मिळाला, आता आमदार म्हणणार आम्हाला मिळू दे राजकीय वर्चस्व. उद्धव ठाकरेंना सध्या बरे नाहीये. जाऊ दे ना त्यांना सोडा. तीन खासदारांना त्यांना घेऊन बसू द्या. बाळासाहेबांची मला आठवण येते, उद्धवची नाही. वाईट वाटते जो पक्ष मी सुरुवातीपासून पाहिला, त्याचा आज अस्त होताना मला बरे वाटत नाही. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत केला आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता नारायण राणे यांनी आमदार फुटणार असल्याचे विधान केल्याने आगामी काळात उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाल्याचे नाकारता येत नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *