Headlines

साताऱ्यातील बसप्पाची वाडीतील गुटखा साठ्यावर धाड:61 हजारांचा मुद्देमाल जप्त दांपत्य ताब्यात, वॅगनआर वाहनही जप्त; FDA ची धडक कारवाई




अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सातारा तालुक्यातील बसप्पाची वाडी येथे प्रतिबंधित गुटखा व सुगंधी पानमसाल्याच्या साठ्यावर धाड टाकून 25 किलो गुटखा जप्त केला. या कारवाईत 61 हजार 513 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका वॅगनआर चारचाकी वाहनासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात पुनम रमेश चव्हाण आणि रमेश शंकर चव्हाण (रा. बसप्पाची वाडी, ता. सातारा) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाला बसप्पाची वाडी परिसरात प्रतिबंधित गुटखा व सुगंधी पानमसाल्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी पथकाने छापा टाकला. तपासणी दरम्यान एका बंद खोलीत तसेच वॅगनआर वाहनामध्ये पानमसाला व सुगंधी तंबाखूचा सुमारे 25 किलो साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत 61 हजार 513 रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले. सहआयुक्त एस. के. भोगावडे आणि सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आ. रे. खापणे व पी. एन. वाईकर यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 223, 274 आणि 275 अन्वये कारवाई करण्यात आली असून गुटखा साठविण्याची जागा सील करण्यात आली आहे. तसेच संबंधित वाहनही जप्त करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *