Headlines

गुडबायचे स्टेट्स ठेवून केली युवकाने आत्महत्या:फुलंब्रीत मराठा आरक्षणाचा सलग दुसरा बळी‎




फुलंब्री तालुक्यातील पिंप्री (सताळा) येथील २३ वर्षीय गणेश कैलास पवार या तरुण युवकाने रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास राहत्या घरच्या मागील शेतात (गट नंबर १४२) गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. सततची नापिकी, यावर्षीचा भीषण दुष्काळ आणि मराठा आरक्षण परिस्थितीमुळे शैक्षणिक फी भरण्यास येणार नाही या विवंचनेत गणेश होता. तसेच मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे वाढलेल्या तीव्र मानसिक ताणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. गणेश पवार याने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर अत्यंत भावूक व वेदनादायी संदेश ठेवले होते. या दुनिया मध्ये जर चांगलं बनायचं असेल तर मरावं लागतं खरंच आणि गुडबाय असे स्टेटस ठेवून त्याने आपली अखेरची भावना व्यक्त केली होती. मराठा आरक्षणाचा आणखी एक तरुण बळी गेल्याने सर्वत्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. वडोद बाजार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास वडोद बाजार पोलीस करत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *