Headlines

करमाड परिसरातील धरणांतून पाण्याचा अवैध उपसा सुरूच:22 गावांवर पाण्याचे भीषण संकट




यंदा अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामातील पिके हातची गेली असून परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश असतानाही, लाहुकी मध्यम प्रकल्प व हिवरा परिसरातील धरणांतून पाण्याचा अवैध उपसा सुरू आहे. प्रशासकीय दुर्लक्षामुळे २२ गावांवर पाणी संकटाची टांगती तलवार आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने मक्याला कणसे लागली नाहीत, सोयाबीनला शेंगा धरल्या नाहीत व कापसाची वाढ खुंटली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आगामी काळात पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आहे. करमाडसह परिसरातील २२ गावांची पाण्याची भिस्त लाहुकी व हिवरा धरणांवर आहे. भांबर्डा-बनगाव परिसर व इतर धरणांतून होणारा उपसा तातडीने न थांबवल्यास डिसेंबरमध्येच टँकर सुरू करण्याची वेळ येईल. याबाबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी संजय भगत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. उपलब्ध पाणीसाठा जपला नाही तर गंभीर संकटाला सामोरे जावे लागेल. संबंधित विभागाने पाहणी करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे असे ग्रामस्थ ज्ञानेश्वर दौंड यांनी सांगितले. लाहुकी आणि हिवरा धरणांवर तालुक्यातील सुमारे २२ गावांच्या पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे. धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नसताना पाणीसाठा कमी होत असेल, तर ही चिंतेची बाब आहे. धरणे कोरडी पडल्यानंतर कारवाई पथक स्थापन करण्यापेक्षा प्रशासनाने आताच पाहणी करून पाण्याचा अवैध उपसा रोखावा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते राहुल तारो यांनी केली आहे. उपाययोजना कराव्यात Ãपावसाचे प्रमाण कमी असल्याने उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. प्रशासनाने अवैध उपसा रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. -दत्ता उकर्डे , माजी सरपंच, करमाड



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *