Headlines

दोडी बुद्रुकमध्ये आजपासून ‘सत्याग्रह’:विश्वस्त मंडळाच्या वैधतेवर‎ग्रामस्थांचे प्रश्नचिन्ह‎




दोडी बुद्रुक येथील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त मंडळाची वैधता तपासून संस्थेच्या शाळा व महाविद्यालयावर तातडीने प्रशासक नियुक्त करावा, या मागणीसाठी ग्रामस्थ व सभासद सोमवार (दि. १९) पासून बेमुदत सत्याग्रह आंदोलन करणार आहेत. येथील श्री ब्रह्मानंद स्वामी महाराज समाधीस्थळावर सकाळी ९ ते सायंकाळी ५:३० या वेळेत हे आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात पांडुरंग विंचू, गजानन सांगळे, रघुनाथ आव्हाड, अशोक सांगळे आणि रमेश उगले यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच वावी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना लेखी निवेदन दिले आहे. संस्थेची स्थापना १९७९ मध्ये दादा पाटील केदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. मात्र, संस्थेच्या विश्वस्त मंडळासंदर्भातील काही फेरफार अर्ज अद्याप मंजूर झालेले नाहीत. तसेच, २००१ ते २००६ आणि २००७ ते २०१२ या कालावधीतील फेरफार अर्ज रद्दबातल ठरले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील कागदपत्रांची सखोल पडताळणी करून विद्यमान विश्वस्त मंडळाची वैधता निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *