Headlines

हरसूल-ठाणापाडा विभागातील 18 गावांत पिके करपली:शेतकऱ्यांच्या हाती यंदा शून्य, आमदार हिरामण खोसकरांकडून पाहणी




हरसूल-ठाणापाडा परिसरातील १८ गावांमध्ये पावसाअभावी भात, नागली, उडीद व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पिकांची अवस्था बिकट झाली असून, उत्पादनाची आशा संपली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार हिरामण खोसकर यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत नुकसानग्रस्त शेतीची प्रातिनिधिक स्वरूपात पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून अहवाल तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार खोसकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची स्थिती जाणून घेतली. अनेक ठिकाणी पिकांऐवजी केवळ गवत शिल्लक राहिल्याचे चित्र होते. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत लवकर मिळावी, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन त्यांनी तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक यांना केले. दौऱ्यात डॉ. रघुनाथ भोये, विनायक माळेकर, हिरामण जाधव, गोकुळ बत्तासे, योगेश देवरगावकर, अकलाक शेख यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. या १८ गावांत पाहणी कोणे, साप्ते, वाघेरा, चिंचवड, शिरजगाव, मुरंबी, मुलवड, सावरपाडा, बेरवळ, गारमाळ, खडकओहोळ, कडेगाव, गोलदरी, देवडोंगरा, वीराचा पाडा, बोरीपाडा, ठाणापाडा आणि हरसूल. एक रुपयाचेही पीक हाती येणार नाही पिकांची दयनीय अवस्था पाहता यंदा उत्पादनातून एक रुपयाचाही मोबदला मिळण्याची शक्यता नाही. पावसाळी शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. नुकसानभरपाई लवकर मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार. – हिरामण खोसकर, आमदार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *