![]()
तालुक्यातील हुंड्यामोख (गणोरे) शिवारात शनिवारी (दि. १७) सोयाबीन काढणीचे काम सुरू असताना हार्वेस्टर यंत्रात अडकून १५ वर्षीय ओम संतोष मोरे याचा मृत्यू झाला. ओम हा कुत्तरबारी येथील रहिवासी होता. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुत्तरबारी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कळवण तालुक्यातील पुनंद खोऱ्यातील हुंड्यामोख शिवारात सोयाबीन काढणीचे काम सुरू होते. शनिवारी (दि. १७) सोयाबीनच्या पेंड्या हार्वेस्टर यंत्रात टाकत असताना ओमचा हात आणि डोके यंत्रात अडकले. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कळवण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Source link
हार्वेस्टरमध्ये अडकून १५ वर्षीय ओम मोरेचा मृत्यू:हुंड्यामोख शिवारातील दुर्दैवी घटना