Headlines

तरुणावर गोळीबार, 2 राउंड हवेत फायर:नाशिकमधील आडगावात शेताकडून घरी जाणाऱ्या तरुणाला अडवून दहशत




आडगाव न्यू इंग्लिश स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर तरुणाला अडवत दोघांनी वाद घालून गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. १८) दुपारी २ वाजता घडला. हल्लेखोर जेलरोड येथील असल्याची माहिती पुढे अाली. पथक संशयित राहुल अांबेकरच्या मागावर अाहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश माळोदे हा शेतातील कामे संपवून न्यू इंग्लिश स्कूल रस्त्यावरील पुलाखालून घराकडे जात असताना महामार्गावरून अालेल्या दुचाकीवरील दोघांनी माळोद यांना अाडवले. शिविगाळ करत वाद घातला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. संशयिताने कमरेला लावलेला गावठी पिस्तूल काढून दोन राउंड हवेत फायर केले. माळोद यांनी चपळाई दाखवत पळ काढला. गोळीबाराच्या अावाजाने हाॅटेल, पंपावरील कामगार, नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. वादाचा दुसरा पैलू तपासणार

अाडगाव पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या अाहे. फिर्यादीचे अाणि संशयित एकमेकांना अोळखत नाही. शेती व्यावसायिक अाहे कधी कुणाच्या संपर्कात नाही. तरी देखील त्यांच्यावर गोळीबार झाला. गोळीबार करण्यापर्यंत हा वाद गेल्याने यामागे दुसरे कारण असण्याची शक्यता अाहे. दोन्ही बाजूने तपास सुरु केला अाहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *