Headlines

अभोण्यात अवैध वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर जप्त:3.56 लाख रुपयांचा‎मुद्देमाल हस्तगत‎




पुनद नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करणाऱ्या विनानंबर ट्रॅक्टरवर अभोणा पोलिसांनी अभोणा-गिरणा नदी पुलावर कारवाई केली. या कारवाईत वाळू व ट्रॅक्टरसह ३ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ट्रॅक्टर मालक महेश जाधव व चालक समाधान चंदू बर्डे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभोणा व पश्चिम पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक सुरू आहे. एकीकडे संपूर्ण परिसर तीव्र पाणीटंचाईचा सामना करत असताना, दुसरीकडे पुनद व गिरणा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा केला जात असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे. वाळूच्या बेकायदेशीर उपशामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावण्याची भीतीही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. अवैध वाळू वाहतुकीबाबत वाढलेल्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी कनाशी रस्त्यावरील अभोणा-गिरणा नदी पुलावरून जाणारा विनानंबर ट्रॅक्टर व ट्रॉली अडवली. तपासणी केली असता ट्रॅक्टरमध्ये अवैधरीत्या उपसा केलेली वाळू आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी वाळू व ट्रॅक्टरसह एकूण ३ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस शिपाई विजय मोरे यांनी अभोणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून ट्रॅक्टर मालक महेश जाधव (वय ३०, रा. अभोणा, ता. कळवण) आणि चालक समाधान चंदू बर्डे (वय ३१, रा. निमपाडा, ता. कळवण) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने सातत्याने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *