Headlines

मराठा समाजाला आरक्षण‎मिळत नसल्याने आत्महत्या‎:फुलंब्री तालुक्यातील पाल येथील हृदयद्रावक घटना




मराठा समाजाला आरक्षण मिळत‎‎नसल्याच्या तीव्र‎‎चिंतेतून फुलंब्री‎‎तालुक्यातील पाल‎‎येथील एका ३५‎‎वर्षीय युवकाने‎‎टोकाचे पाऊल‎‎उचलत आपली‎‎जीवनयात्रा‎‎संपवली. अनिल‎अन्साराम जाधव (वय ३५) असे‎मृत युवकाचे नाव असून, रविवार‎रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही‎दुर्दैवी घटना घडली.‎ मिळालेल्या माहितीनुसार, अनिल‎जाधव यांनी आपल्या राहत्या घरात‎गळफास घेऊन आत्महत्या केली.‎मराठा समाजाला अद्याप आरक्षण‎मिळत नसल्याच्या नैराश्यातून त्यांनी‎हे कृत्य केल्याची चर्चा सध्या‎ग्रामस्थांमध्ये आणि परिसरात सुरू‎आहे. ​या घटनेची माहिती मिळताच‎फुलंब्री पोलिस ठाण्याचे पथक‎तातडीने घटनास्थळी दाखल होत‎सदरील तरुणाला फुलंब्री येथील‎शासकीय रुग्णालयात दाखल‎करण्यात आले असता डॉक्टरांनी‎त्याला मृत घोषित केले,‎शवविच्छेदन करून रात्री ७ वाटेच्या‎सुमारास त्यांच्यावर शोकाकुल‎वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात‎आले. फुलंब्री पोलिस ठाण्यात‎सदरील घटनेची नोंद करण्यात‎आली आहे. या दुर्घटनेमुळे पाल‎परिसरात शोककळा पसरली असून‎सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.‎दरम्यान घटनेमुळे पालसह परिसरात‎खळबळ उडाली आहे.‎
‎‎‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *