![]()
पतीकडून पत्नीच्या छळाच्या अनेक घटना समोर येतात, पण एका पत्नीने परपुरुषाच्या नादात आपल्या ५० वर्षांच्या सरकारी नोकरदार पतीचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे त्या पतीवर ८१ वर्षांच्या आईसह आता भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारच्या सेवेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले हे पती आपल्या पत्नी, मुलगी, मुलगा आणि आईसोबत राहत होते. त्यांची मुलंही उच्चशिक्षित. मात्र, पत्नीची एका परपुरुषासोबत जवळीक वाढली. यातूनच खटके उडू लागले. या व्यक्तीने कर्ज काढून बेगमपुरा भागात घर घेतले आहे. त्याचे हप्तेही तेच भरतात. कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशानंतर १० सप्टेंबरपासून ते पुन्हा एकत्र राहू लागले, पण घरात पत्नीने त्रास देणे सुरू केले. त्यांना जेवण, नाष्टा मिळत नव्हता. आपले कपडेही त्यांना स्वतःच धुवावे लागत होते. घरखर्च त्यांनीच उचलला, असे तक्रारीत म्हटले आहे. घर मिळवून देण्यासाठी पोलिसांना साकडे वादामुळे गृहकर्जाचे हप्ते थकल्याने बँकेने घर जप्तीची नोटीस बजावली होती. या पती-पत्नीने घरातील संकट टाळण्यासाठी स्वतः बँकेचे तब्बल १ लाख ४२ हजार रुपये भरून घराची जप्ती टाळली. मात्र, पैसे भरून काही दिवस लोटत नाही तोच २ ऑक्टोबर रोजी पत्नीने परपुरुषाला हाताशी धरून या सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि घरातून हाकलून लावले. कष्टाने घेतलेल्या घरातच आज त्यांना प्रवेश मिळेनासा झाला. याप्रकरणी त्यांनी पोलिस आयुक्त आणि बेगमपुरा पोलिसांकडे धाव घेऊन निवेदन सादर केले असून किमान आपल्या मालकीचे घर परत मिळवून द्यावे, असे साकडे त्यांनी पोलिसांना घातले आहे.
Source link
पत्नीने घराबाहेर हाकलून दिले; त्रस्त झालेल्या पतीची थेट पोलिसांत तक्रार:पतीवर 81 वर्षांच्या आईसह भाड्याच्या घरात आश्रय घेण्याची वेळ