Headlines

लासूर स्टेशन:सनव खून प्रकरणातील सात जणांना अटक




सनव (ता. गंगापूर) येथील शिवना नदीपात्रात वाळू उपशाच्या वादातून दहा दिवसांपूर्वी मध्यरात्री दोन गटांत झालेल्या हाणामारीत लोखंडी रॉडने डोक्यात वार करून रियाज साहेबखा पठाण यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील सात जणांना पोलिसांनी विविध ठिकाणांहून ताब्यात घेतले असून,त्यापैकी सहा जणांना अटक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. एका विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. शिल्लेगाव पोलिस ठाण्यात ८ ऑक्टोबर रोजी मृतांचा मुलगा इरफान रियाज पठाण यांच्या फिर्यादीवरून १० जणांवर गुन्हा क्रमांक ४८६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल आहे. रियाज साहेबखा पठाण वय ४२ राहणार सनव यांचा खून झाला होता. या प्रकरणातील मुस्तफा हुसैन शेख, अल्ताफ मुस्तफा शेख आणि सद्दाम मुस्तफा शेख या तिघांना कोपरगाव येथून, तर सलमान रब्बानी शेख याला नांदी (ता. अंबड) येथून ताब्यात घेण्यात आले. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने असिफ रशीद शेख, अक्रम मन्सूर शहा आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला पैठण औद्योगिक वसाहत परिसरातून ताब्यात घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *