![]()
जिल्ह्यात तापमानाचा पारा ४३ अंशांवर पोहोचला असून, जलस्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ६१ गावांत टंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, या गावांना ८६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, जलजीवन मिशनची कामे रखडलेली असल्याने नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. पैठण तालुक्यात सध्या १६ गावांमध्ये २९ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून, दररोज ५४ खेपा करण्यात येत आहेत. या टँकरद्वारे ५३ हजार ८०१ नागरिकांना दिलासा दिला जात असला तरीही अनेक गावात टँकरने शुद्ध पाणी पुरवठ्यावर प्रश्न निर्माण झाले आहे. परिणामी, आडूळ भागातील अनेक तांडे, वस्तीवर ५ रुपयांना हंडाभर तर ५० रुपयांना बॅरेल भरून पाणी विकत घ्यावे लागत आहे, तर ब्राह्मणगाव तांडा येथील महिलांनी विहिरीवरील पाणी शेंदून घ्यावे लागत आहे. सध्या लासूरगाव, वाघोळी खुर्द, राजापूर पांगरी, बाळापूर, आडूळ बु., आष्टी, आंतरवाली तांडा, केकत जळगाव, चित्तेगाव तांडा, घोडेवाडी, आष्टीगाव तांडा, पिंपळगाव, पाडळी या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा आहे. दरम्यान, वैजापूर तालुक्यात १९ विहिरींचे अधिग्रहण असून, नारंगी प्रकल्पात ४१.५३, बोर दहेगावमध्ये ४५.४३, कोल्हीत ३३.५४, बिलवणीत ३०.९१ टक्के तर सटाणा प्रकल्पात अवघा १५.५८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. खंडाळा प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडला आहे. ^पैठण तालुक्यात ज्या गावांत टंचाई आहे तेथील ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहे. त्यानुसार टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांनी शुद्ध पाणी वितरीत केले जात असून, अनेक गावांत जल योजनेची कामे पूर्ण नसल्याने टँकरने पाणी देण्यात येत आहे. – राजेश कांबळे, पाणी पुरवठा अधिकारी पंचायत समिती, पैठण कन्नड | तीव्र उन्हामुळे तालुक्यातील जलसाठ्यांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. बहुतांश गावांत जलजीवन मिशनची कामे रखडली आहेत. १५ गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. तेथे १६ विहिरी अधिग्रहित केल्या असल्याची माहिती गटविकास अधिकारी विजयकुमार पंडित यांनी दिली. भांबरवाडी येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा आहे. जलजीवनची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी जि. प. सदस्य तृप्ती राजपूत, डॉ. दिलीपसिंग राजपूत यांनी केली. सिल्लोड | तालुक्यात २१ गावांना २८ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. इतर १३ गावांच्या पाण्यासाठी १४ विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. कोणत्याही गावाला पाण्याची टंचाई जाणवू देणार नाही असे सभापती अनिता बनकर यांनी सांगितले. २१ गावांना २८ टँकरद्वारे ५३ खेपा सुरू आहेत. १३ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. पैठण, वैजापूर, फुलंब्री, कन्नड, सिल्लोड तालुक्यात जलजीवन मिशन योजनेची कामे करण्यात आली असून, ती अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यातही ६१ गावांतील नागरिकांनी टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. काही ठिकाणी तर अधिग्रहण असले तरी पाण्यासाठी शेतशिवारात भटकंती करावी लागत असल्याची स्थिती आहे. फुलंब्री | सध्या ६ गावांमध्ये ८ टँकर सुरू करण्यात आले आहेत, १५ गावांमध्ये १५ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. बिस्मिल्लाखा गावात २ टँकर, निधोना २, वावना १, मारसावळी १, धनशीवस्ती १, गेवराई गुंगी येथे १ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर १५ खासगी विहीर अधिग्रहण केलेल्या गावांमध्ये रेलगांव, मुर्शिदाबादवाडी, पिंपळगाव वळण, आडगाव खुर्द, कान्हेगाव, हिवरा आणि म्हसला या गावांचा समावेश आहे. तसेच टँकर सुरू असलेल्या बिस्मिल्लाखाँ गाव, वावना, मारसावळी, धनशीवस्ती, गवराई गुंगी येथे प्रत्येकी १ विहीर आणि निधोना गावासाठी ३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १५ विहिरींपैकी ८ गावांत विहिरींचा गावासाठी तर ७ गावांत टँकर भरण्यासाठी वापर आहे. जलजीवनची कामे अपूर्ण ; पाण्यासाठी पायपीट सुरुच पंचायतीकडे प्रस्ताव आल्यानंतर टँकर सुरू कन्नडमध्ये जलस्रोत आटले; १५ गावांना तीव्र पाणीटंचाई फुलंब्री तालुक्यात ६ गावांना ८ टँकरने पाणीपुरवठा; १५ विहिरींचे अधिग्रहण
Source link
जिल्ह्यात 61 गावांची तहान 86 टँकरवर:सिल्लोड, पैठण, फुलंब्री, वैजापूर, कन्नड तालुक्यात जलजीवनची कामे कागदावरच