Headlines

बाजारपेठेतून गावरान आंबा गायब:आता परराज्यातील आंब्यांना मागणी; बदाम, दशहरी व केशर आंब्यांनी सजली दुकाने‎




गावरान आंबा म्हटले की डोळ्यासमोर येतो तो रसाळ, मधूर आणि सुगंधाने भरलेला आंबा. तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गावरान आंब्यांची आमराई असायची. नातेवाइकांना खास आमरसाचे निमंत्रण दिले जायचे. मात्र, आता बदलत्या काळात आणि दुष्काळी परिस्थितीमुळे सिल्लोड तालुक्यातील गावरान आंबा आता दुर्मिळ होत चालला असून त्याची जागा बदाम, दशहरी, केशर आंब्याने घेतल्याचे चित्र आहे. सध्या बाजारपेठेत ग्राहकांकडून केशर आंब्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तालुक्यात म्हणावा तेवढ्या प्रमाणात केशर आंबा उपलब्ध नसल्याने बदाम, दशहरी तेलंगणा राज्यातून तर केशर आंबा गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात सिल्लोडच्या बाजारपेठेत येतो. मागील पंधरा ते वीस वर्षांत आलेल्या दुष्काळी परिस्थितीचा मोठा परिणाम आंब्याच्या झाडांवर झाला. आता दुर्मिळ ठिकाणी गावरान आंब्याची झाडे शिल्लक आहेत. सिल्लोडच्या बाजेरपेठेत गावरान आंबा दुर्मिळ झाला असून गावरानची जागा आता केशर आंब्याने घेतली आहे. केशरला तीन ते चार वर्षांत फळधारणा केशर आंब्याला तीन ते चार वर्षांत फळधारणा सुरू होते. बाजारात त्याला चांगला दरही मिळतो. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्टिकोनातून केशर आंब्याला प्राधान्य देत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केशर आंब्याची लागवड सुरू केली आहे. तालुक्यात असलेल्या केशर आंब्याच्या बागांसोबतच गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात सिल्लोडच्या बाजारपेठेत केशर आंब्याची आवक होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *