Headlines

मराठी साहित्याचा जागर!:नाशिकच्या ‘अक्षरबंध प्रतिष्ठान’तर्फे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे आयोजन; 30 जुलैपर्यंत प्रवेशिकांचे आवाहन




मराठी साहित्य क्षेत्रात सातत्याने दर्जेदार लेखन करून ते समृद्ध करणाऱ्या लिहित्या हातांचा सन्मान करण्यासाठी नाशिकच्या अक्षरबंध प्रतिष्ठानच्या वतीने द्विवार्षिक राज्यस्तरीय ‘अक्षरबंध’ साहित्य पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कारांची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण जोंधळे यांनी दिली. या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत दर दोन वर्षांनी आठ वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील उत्कृष्ट साहित्यकृतींचा गौरव केला जातो. पुरस्काराचे स्वरूप रोख ₹३,००० आणि स्मृतिचिन्ह आहे. पुरस्कारांचे विविध गट आणि स्वरूप ‘जीवनगौरव’ आणि ‘साहित्यरत्न’ विशेष सन्मान मुख्य पुरस्कारांसोबतच साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी दोन विशेष मानाचे पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रवेशिका पाठवण्यासाठी अटी व नियम पात्रता कालावधी: १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या दोन वर्षांच्या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यकृतीच या स्पर्धेसाठी पात्र असतील. पाठवायचे साहित्य: लेखकांनी आपल्या साहित्यकृतीच्या दोन प्रती, सोबत स्वतःचे परिचय पत्र आणि रंगीत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र पाठवणे आवश्यक आहे. अंतिम तारीख: प्रवेशिका पाठवण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०२६ ही आहे. साहित्य पाठवण्याचा पत्ता अक्षरबंध प्रतिष्ठान, दहावा मैल, जऊळकेदिंडोरी, ओझर (मिग), जिल्हा: नाशिक – ४२२००७. दात्यांचे मोलाचे सहकार्य साहित्य क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी या पुरस्कारांसाठी आपले योगदान दिले आहे. यामध्ये शं. क. कापडणीस, सप्तर्षी माळी, तुकाराम ढिकले, प्रशांत कापसे, डॉ. प्रकाश कोल्हे, प्रभाकर चौधरी, दीपाली मोगल-बोंबले आणि कपिल भालके यांनी विविध विभागांतील पुरस्कार पुरस्कृत केले आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क या पुरस्कारांविषयी अधिक माहिती किंवा चौकशीसाठी लेखकांनी ९९२२९४६६२२ किंवा ९८५०६९७९४० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष सप्तर्षी माळी, सचिव साई बागडे, खजिनदार सुवर्णा घुगे, कल्याणी देशपांडे, डॉ. गणेश मोगल व योगेश विधाते यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *