![]()
निसर्गाचा लहरीपणा आणि सूर्याचा आग ओकणारा तडाखा अशा दुहेरी संकटाचा सामना करत मोहोळ तालुक्यातील बळीराजा आगामी खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. यंदा तालुक्यात सुमारे ३० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला असून, गेल्या वर्षी
.
तालुक्यात सध्या पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या या उन्हात दुपारी शुकशुकाट असतो, मात्र जिद्दी शेतकरी पहाटेपासूनच शेतात दाखल होत आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी, खोडकणी आणि कुळवणीची कामे वेगाने सुरू आहेत. जमीन तापलेली असताना मशागत केल्यास कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो, या उद्देशाने शेतकरी राबताना दिसत आहेत. मात्र, इंधनाचे दर वाढल्याने यंदा मशागतीचे गणितही महागले आहे.
तालुका कृषी विभागाने खरिपासाठी कंबर कसली असून महाबीजकडे विविध बियाणांची मागणी नोंदवली आहे. युरिया, डीएपी, एनपीके यांसह एकूण २० हजार २३८ मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली आहे. दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी कृषी सहाय्यकांमार्फत गावोगावी बियाणांची उगवण क्षमता तपासण्यासाठी ‘गोणपाट चाचणी’चे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. पीक क्षेत्र (हे.) मका १३,६०० सोयाबीन ९,४०० तूर ३,८०० उडीद ३,००० मूग ५०० भुईमूग २०० एकूण ३०,५०० ^हवामान अंदाज प्रवर्तक यंदा सर्वच ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवित असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. ८० ते ९० मिमी पाऊस झाल्याशिवाय बियाणे जमिनीत टाकू नये. जमिनीचा ओलावा तपासूनच पेरणी करावी. बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. घरगुती बियाणे वापरत असाल तर त्याची अगोदर उगवण क्षमता पहा. — हर्षद निगडे, तालुका कृषी अधिकारी, मोहोळ. मोहोळ तालुक्यात सध्या ‘जलतारा’ अभियान राबवले जात आहे. यात खड्डा खोदून पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
‘जलतारा’ने पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याचा प्रयत्न
तज्ज्ञांचा सल्ला, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये