![]()
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांनी पुन्हा एकत्र यायला हवे. हे दोन्ही गट एकत्र आले तर ताकद नक्कीच वाढेल. यासाठी शिंदे व उद्धव ठाकरे यांनी दोन पावले माघार घ्यावी, असे मत माजी आमदार बच्चू कडू यांनी येथे शनिवारी (२० जून) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. बच्चू कडू म्हणाले की, शिवसेना ही महाराष्ट्राच्या मातीतली आणि या भूमीतील संघटना आहे. त्यामुळे ती मजबूत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दोन्ही गट एकत्र आले पाहिजेत, ही माझी वैयक्तिक भावना आहे. पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र बसून योग्य नियोजन केले, तर शिवसेनेची वज्रमूठ कशी तयार होते हे पाहायला काय हरकत आहे? राजकारण हे बेरजेचे असते “राजकारण हे नेहमी बेरजेचे असते, वजाबाकीचे नाही. त्यामुळे पक्षात फूट पडण्यास केवळ बाहेर पडणारे लोकच जबाबदार कसे असतील?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ओमराजे निंबाळकर यांच्या न्यायालयीन प्रकरणाचा संदर्भ देत कडू म्हणाले की, “न्यायालयाकडून निकाल लागण्यास उशीर होणे हादेखील अन्यायच आहे.’
Source link
राजकारण:दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास शक्ती नक्की वाढेल, शिंदे-उद्धव ठाकरे यांनी दोन पावले माघार घ्यावी- बच्चू कडू