Headlines

रायगडमध्ये डोंगराला तडे:नाणेघोळ गावावर भूस्खलनाचे सावट! धोका ओळखून 60 ते 70 ग्रामस्थांचे स्थलांतर




रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असतानाच पोलादपूर तालुक्यातून एक अत्यंत धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. तालुक्यातील देवळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील ‘नाणेघोळ’ गावाजवळील डोंगराला अतिवृष्टीमुळे चक्क अर्धा किलोमीटर लांबीच्या आणि अर्धा ते एक फूट रुंदीच्या महाकाय भेगा पडल्या आहेत. डोंगराचा भाग खचू लागल्याने आणि संभाव्य भूस्खलनाचा मोठा धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने तातडीने पावले उचलत, गावातील ६० ते ७० नागरिकांचे रातोरात सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात सध्या प्रचंड भीतीचे वातावरण आहे. जमिनीला अर्धवर्तुळाकार भेगा; प्रशासनाची धाव गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात आणि विशेषतः पोलादपूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या सततच्या पावसामुळे नाणेघोळ गावाजवळील डोंगर परिसरात जमिनीला मोठ्या भेगा गेल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच महसूल आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या पाहणीत डोंगराच्या भूभागाला सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर ‘अर्धवर्तुळाकार’ स्वरूपात तडे गेल्याचे भयंकर वास्तव समोर आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने कोणताही धोका न पत्करता ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला. ‘२०२३ मध्येही घरे उद्ध्वस्त, तरीही दुर्लक्ष’ सध्या सुरक्षित स्थळी स्थलांतरित झालेल्या ग्रामस्थांच्या मनात भीतीसोबतच प्रशासनाविषयी तीव्र संतापही आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी म्हणजेच २०२३ मध्येही याच गावात अशाच नैसर्गिक कारणांमुळे ३ घरे कायमची उद्ध्वस्त झाली होती. मात्र, त्यावेळी प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, अशी खंत गावकऱ्यांनी बोलून दाखवली. “आता तरी शासनाने आणि प्रशासनाने आमच्या जिवाशी न खेळता या परिस्थितीकडे लक्ष द्यावे,” अशी आर्त हाक ग्रामस्थांनी दिली आहे. कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार डोंगराला गेलेले तडे आणि ग्रामस्थांची अवस्था पाहता, आता प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पोलादपूरच्या तहसीलदारांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, “सध्या ग्रामस्थांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र, भविष्यातील धोका टाळण्यासाठी या गावाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा आणि ग्रामस्थांसाठी नवीन घरकुलांचा प्रस्ताव शासनाकडे तत्काळ पाठवण्यात येणार आहे.” प्रशासनाच्या या आश्वासनानंतर आता शासन नाणेघोळ गावाच्या पुनर्वसनाचा निर्णय किती वेगाने घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. संबंधित बातम्या वाचा.. नाशिककरांवरील ‘ढगफुटी’चे संकट टळले!: अतिवृष्टीचा भोवरा सुरत-अकोलेकडे वळला नाशिककरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. हवामान खात्याने नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात तब्बल ३५० मिलीमीटर पावसाचा, म्हणजेच ‘ढगफुटी’चा धडकी भरवणारा इशारा दिला होता. मात्र, पालघरमध्ये हाहाकार उडवणारा पावसाचा ‘भोवरा’ ऐनवेळी नाशिकच्या वेशीवरून दुसरीकडे वळल्याने शहरावरील अतिवृष्टीचे संकट टळले आहे. असे असले तरी, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरसारख्या घाटमाथ्यांवर अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात अत्यंत वेगाने आणि समाधानकारक वाढ होत आहे. असा टळला नाशिकवरील धोका… पालघर जिल्ह्यात तब्बल ४५० मिमी पावसाची नोंद करणारा हवामानातील तोच ‘भोवरा’ सोमवारी रात्री त्र्यंबकेश्वर-नाशिक मार्गे सरकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. यामुळे नाशिकमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. सोमवारी रात्रभर पावसाने शहरात जोरदार हजेरीही लावली. मात्र, मंगळवारी सकाळी हवामानाच्या स्थितीत मोठा बदल झाला. हा भोवरा नाशिककडे न येता उत्तरेकडे गुजरातच्या सुरतच्या दिशेने आणि दक्षिणेकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले परिसराकडे सरकला आहे. यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरवरील ढगफुटीचा धोका बऱ्याच अंशी कमी झाला आहे. सविस्तर वाचा..
उद्घाटनाच्या दोनच महिन्यांत फज्जा: काय आहे मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प? खड्डे आणि दरड दुर्घटनेवरून विरोधकांचे सरकारला जळजळीत प्रश्न मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पहिल्याच मुसळधार पावसात वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन अवघे दोन महिने उलटत नाहीत, तोच बोगद्यांमध्ये झालेली पाण्याची गळती, मुख्य रस्त्याला गेलेले तडे आणि दरड दुर्घटना यामुळे या 7 हजार कोटींच्या प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरूनच आता विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरत, हा तांत्रिक चमत्कार आहे की कंत्राटदारांना पोसणारा कमिशनखोरीचा नवा मार्ग?” असे जळजळीत प्रश्न उपस्थित करत सरकारची कोंडी केली आहे. एकीकडे सत्ताधारी याला केवळ दरड कोसळण्याची नैसर्गिक घटना असे सांगत प्रकल्पाचा बचाव करत असले, तरी अवघ्या 60 दिवसांत उघड पडलेल्या या त्रुटींमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नेमका काय आहे हा जगातील सर्वात रुंद बोगदा असणारा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प, याचे तांत्रिक आव्हान काय होते आणि या पहिल्याच दुर्घटनेवरून राजकीय वर्तुळात नेमकं काय रामायण रंगलंय? याचा घेतलेला हा सविस्तर आढावा… सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *