Headlines

'शुरूवात वो लोग करते है लेकीन खत्म हम करते है':संग्राम जगतापांचा इशारा, म्हणाले – 26 तारखेला त्यांनी बैल कापला तर आम्ही 27 तारखेला…




बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे आयोजित हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान एका सभेत बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याने आता परिसरातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत संग्राम जगताप यांनी, “शुरूवात वो लोग करते है लेकीन खत्म हम करते है” असा थेट इशारा देत, “जनगणना झाली तर यांची संख्या 40 कोटींच्या पुढे जाईल,” असा दावाही त्यांनी केला. एका 6 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराचा आणि तक्रार देण्यासाठी गेल्यावर पोलीस स्टेशनवर झालेल्या दगडफेकीचा संदर्भ देत त्यांनी, हे लोक लोकांना भयभीत करतात, परंतु या झुरळांना आता घाबरण्याची अजिबात गरज नाही. ही विचारधारा हिंदुत्ववादी लोकांनी विसरता कामा नये, असे टोकाचे विधान यावेळी केले. संग्राम जगताप म्हणाले, पोलिस प्रशासनाला आजच सांगतो, 26 तारखेला बैल कापला गेला तर 27 तारखेला इथे आम्ही येऊ. तुम्ही जरा खबरदारी घ्या. राजकीय पक्ष जरी काम करत नसले तरी आपल्याला हिंदू म्हणून काम करावे लागेल. या लोकांशी कुठलाही आर्थिक व्यवहार करायचा नाही, हा कायदा आपण करून टाका, हे आपल्याला ठरवावे लागणार आहे. आपले संघटन कायम ठेवा. हिंदू समाज कधीही थांबणार नाही, असे जगताप यांनी म्हटले. दंगल झाली तर तुम्ही जबाबदार असाल- महेश लांडगे दरम्यान, महेश लांडगे म्हणाले, 6 वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न होतो, पण मदत होत नाही. सर्वधर्म सभावाचा बुडबुडा बाहेर काढा. जो कायदा मानणार नाही, त्यासाठी दांडे हातात घ्या. आपल्यामध्ये काही पुरोगामी विचारांचे किडे आहेत. पुरोगामी विचारांच्या राजकीय लोकांना लाज वाटली पाहिजे. आमच्याकडे पण मतदार आहेत, पण आम्ही स्वार्थी नाहीत. छत्रपती संभाजीनगरला परवा एकाचे घर पाडले. पोलिसांनी जरा गांभीर्याने घ्यावे, पोलिसांनी जर अशा पद्धतीने पक्षपात केला, न्याय दिला नाही तर मग दंगल झाली तर तुम्ही जबाबदार असाल, असा इशारा लांडगे यांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *