![]()
देशभरात गाजलेल्या ‘नीट’ परीक्षेच्या पेपर फुटीनंतर आता महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) देखील पुन्हा एकदा मोठ्या वादात अडकली आहे. ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच लीक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ मोठी कारवाई केली असून, सुरक्षेचा उपाय म्हणून उद्या होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून याबाबतचे अधिकृत आदेश लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर थेट आणि हल्ला चढवला आहे. सरकारचा पेपरफुटीमध्ये थेट सहभाग: अंबादास दानवे
या पेपरफुटीवर तीव्र संताप व्यक्त करत ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. दानवे म्हणाले, “या संपूर्ण पेपरफुटीमध्ये सरकारचाच सहभाग आहे. या सरकारला एक साधी टीईटी परीक्षा देखील नीट घेता येत नाही. प्रत्येक वेळी सरकारकडूनच पेपर फोडले जात आहेत आणि सध्या संपूर्ण राज्य ‘भगवान भरोसे’ सुरू आहे.” विद्यार्थ्यांचा उत्साह संपतोय
सरकारच्या भोंगळ कारभारावर टीका करताना दानवे पुढे म्हणाले, “एक गरीब विद्यार्थी परीक्षेसाठी वर्षाभरापासून दिवस-रात्र तयारी करतो. पण परीक्षेच्या अवघ्या दोन दिवस आधी जर असे पेपर फुटत असतील, तर विद्यार्थ्यांमधील परीक्षा देण्याचा उत्साह पूर्णपणे संपून जातो. याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिकतेवर आणि निकालावर होतो.” ऐन परीक्षेच्या तोंडावर झालेल्या या घोळामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांमधून आणि पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला: प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुन्हा एकदा पेपरफुटीच्या वादात अडकली आहे. ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उद्या होणारी परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, शिक्षण विभागाकडून याबाबत अधिकृत आदेश जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाण्यात पोलिसांचा सापळा, प्रश्नपत्रिका जप्त मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या आदल्या दिवशीच काही जण पैसे घेऊन प्रश्नपत्रिका वाटत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईदरम्यान प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्याचा दावा केला जात असून, काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सविस्तर वााचा
Source link
सरकारकडूनच पेपर फोडले जात आहेत:टीईटी पेपरफुटीनंतर अंबादास दानवे कडाडले, सरकारच्या कारभारावर उठवले प्रश्नचिन्ह