Headlines

सीताराम शुगर समोरील आंदोलन मागे:राजलक्ष्मी गायकवाड यांनी मागण्या मान्य केल्याचे दिले लेखी निवेदन‎




खर्डी येथील सिताराम साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तरुण शेतकऱ्यांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले. सोमवारपासून विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची मोठी चर्चा झाली होती. कारखान्यामुळे होणारे हवा, पाणी आणि भूमी प्रदूषण यांसह विविध समस्यांविरोधात तरुण शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारले होते. अखेर आज (गुरुवार) सायंकाळी पाच वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती आंदोलक तरुणांनी दिली. आंदोलनादरम्यान गजानन घाडगे, अनिल अगावणे, राजू पुंडेकर, आप्पासाहेब घाडगे, विष्णू सुळे, आणि काशिलिंग खताळ यांच्याशी सविस्तर चर्चा करून कारखान्याच्या सर्वेसर्वा राजलक्ष्मी गायकवाड यांनी मागण्या मान्य केल्याचे अधिकृत लेखी निवेदन दिले. यावेळी युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक आणि तालुक्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच तपकिरी शेटफळ व खर्डी भागातील अनेक शेतकरी आणि ग्रामस्थही याप्रसंगी हजर होते. अत्यंत शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने हे आंदोलन पार पडल्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे आंदोलन यशस्वीरित्या सोडवण्यासाठी पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे यांच्यासह सर्व शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कारखान्याच्या गळीत हंगामात तसेच इतर वेळेस देखील सोडले जाणारे सांडपाणी, उडणारी बग्यास आणि पसरणारी दुर्गंधी यामुळे परिसरातील नागरिक व शेतकरी कमालीचे त्रस्त झाले होते. या सर्व समस्यांवर लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, असे आश्वासन कारखाना प्रशासनाकडून देण्यात आले आहे. नागरिकांना दिलासा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *