Headlines

हुंड्यासाठी छळ; पत्नीने घेतला ‎तीन वर्षांच्या बाळासमोर गळफास:कृषी सहाय्यक पतीसह चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल, मेहकरमधील घटना ‎




‎लग्नावेळी तब्बल 31‎‎ लाख रुपये हुंडा व‎‎ चारचाकी वाहन देऊनही ‎‎‎पैशांच्या मागण्या न ‎‎‎थांबल्याने, सततच्या ‎‎‎शारीरिक व मानसिक ‎‎‎छळाला कंटाळून 26‎‎ वर्षीय विवाहितेने ‎गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ‎धक्कादायक घटना 23 जून रोजी मेहकर येथे ‎उघडकीस आली. या प्रकरणी मृत‎ विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून कृषी‎ सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या पतीसह ‎सासू, सासरे व नणंद यांच्याविरुद्ध‎ आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंडाबळी प्रतिबंधक‎ कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला ‎आहे. ‎ बारई (ता. मेहकर) येथील निवृत्त ‎शिक्षक व शेतकरी रतन श्रीकिसन पागोरे‎ त्यांची मुलगी वैष्णवी हिचा विवाह 22 एप्रिल‎ 2022 रोजी गणेश रामेश्वर मेरत यांच्याशी ‎झाला होता. विवाहावेळी वर पक्षाकडून‎ करण्यात आलेल्या मागणीनुसार त्यांनी 31‎ लाख रुपये हुंडा व चारचाकी वाहनही घेऊन‎ देण्यात आले. मात्र लग्नाच्या काही ‎महिन्यानंतर वधूवर आणखी पैशांसाठी‎ वारंवार दबाव टाकला जात होता. वाहनाच्या ‎कर्जाचे उर्वरित हप्ते भरण्याच्या कारणावरून‎ वैष्णवीला मारहाण करण्यात आली.‎ पती गणेश मेरत हा शेअर मार्केटमध्ये‎ मोठ्या प्रमाणात व्यवहार करत असून त्यात‎ लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने माहेरहून पैसे‎ आणण्याचा तगादा लावत होता. यासाठी ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎वैष्णवी वर सातत्याने मानसिक आणि ‎शारीरिक अत्याचार करण्यात येत होते.‎कुटुंबीयांनी अनेक वेळा समेट बैठका घेऊन ‎प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी‎ यापुढे त्रास देणार नसल्याचे आश्वासन ‎सासरच्या मंडळींकडून देण्यात आले. मात्र‎ काही दिवसांनी पुन्हा पैशांसाठी छळ सुरू होत‎ असल्याचे वैष्णवीने आपल्या आई-वडिलांना ‎सांगितले होते. तक्रारीत नमूद करण्यात आले ‎आहे की, काही दिवसांपूर्वी पती व सासरच्या‎ मंडळींनी वैष्णवीकडे 10 लाख रुपये माहेरहून‎ आणण्याची मागणी केली होती. पैसे न‎ आणल्यास “फाशी घेऊन मर” असा दबाव‎ देखील आणण्यात आला होता.‎ 23 जून‎ रोजी सकाळी वैष्णवीने आपल्या वडिलांना ‎फोन करून मागील रात्री झालेल्या ‎मारहाणीची माहिती दिली. तसेच सासरच्या ‎मंडळींचा त्रास असह्य झाल्याने आत्महत्या‎ करण्याचा इशाराही तिने दिला होता.‎ वडिलांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न‎ केला. मात्र काही वेळातच नातेवाइकांकडून ‎वैष्णवीने गळफास घेतल्याची माहिती ‎मिळाली. घराचा दरवाजा उघडल्यानंतर तिचा ‎तीन वर्षीय मुलगा आयांश घरात आढळला.‎ तीन वर्षांच्या चिमुकल्या समोर ‎स्वयंपाकघरात आत्महत्या‎ घटनेवेळी वैष्णवीचा तीन वर्षीय मुलगा‎ आयांश घरातच उपस्थित होता. दरवाजा ‎उघडून त्याने नातेवाइकांना आत प्रवेश‎ दिल्यानंतर स्वयंपाकघरात वैष्णवीचा मृतदेह‎आढळून आला. या घटनेमुळे परिसरात ‎हळहळ व्यक्त होत आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *