Headlines

शिक्षकाने रागावल्यानंतर विद्यार्थिनीने केली आत्महत्या:चंद्रपूर शहरात नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल




चंद्रपूर शहरात नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत मुख्याध्यापकांनी रागावल्याच्या घटनेनंतर घरी परतलेल्या विद्यार्थिनीने शनिवारी (22 ऑगस्ट) आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तनिष्का सुनील गाडगे (वय 14, रा. आनंदनगर प्लाझा अपार्टमेंट, चंद्रपूर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. नेमक प्रकरण काय मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी चंद्रपूर शहरातील कार्मेल अकॅडमीमध्ये नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. शनिवारी तिने वर्गातील फळ्यावर काही मजकूर लिहिल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास आले. या प्रकाराची दखल घेत शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी तिच्या पालकांना शाळेत बोलावले. त्यानंतर विद्यार्थिनीचे वडील शाळेत गेले. त्यांनी प्रभारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांची भेट घेतली. यानंतर त्यांनी विद्यार्थिनीला समजावून सांगत घरी आणले. विद्यार्थिनीला घरी सोडल्यानंतर आई-वडील न्यायालयीन कामासाठी घराबाहेर गेले. मात्र, त्यांच्यानंतर काही वेळातच विद्यार्थिनीने घरातील पंख्याला गळफास घेतल्याचे समोर आले. काही वेळाने हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याचा तपास सुरू आहे. घटनेपूर्वी शाळेत नेमके काय घडले, विद्यार्थिनीने फळ्यावर काय लिहिले होते, त्यावरून शिक्षकांनी पालकांकडे कोणती तक्रार केली आणि त्यानंतर विद्यार्थिनीची मानसिक अवस्था कशी होती, या सर्व बाबींची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. शाळेतील घटना, प्रभारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांची भूमिका, पालकांची शाळेतील भेट तसेच त्यानंतर घडलेल्या घटनाक्रमाची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत. अवघ्या 14 वर्षांच्या विद्यार्थिनीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे ही वृत्त वाचा

केज तालुक्यात 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार:जाब विचारल्याने आईला मारहाण, चार जणांविरोधात गुन्हा दाखल
इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन चिमुकलीस आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना केज तालुक्यात समोर आली आहे. या प्रकरणी पीडित बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दोन तरुणांसह जाब विचारण्यास गेलेल्या तिच्या आईला बेदम मारहाण करणाऱ्या नातेवाइकांवर, अशा एकूण चार जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *