Headlines

जखमीवर ‘सुपर’मध्ये मोफत शस्त्रक्रिया:कवटीच्या फ्रॅक्चरची दुरुस्ती,टाळूचा निखळलेला, मात्र जिवंत भाग जतन‎




धारणी येथील २८ वर्षीय तरुणावर अस्वलाच्या हल्ल्यात झालेल्या दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या डोके व चेहऱ्याच्या दुखापतीवर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे यशस्वी शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य केली. अस्वलाच्या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला, चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या टाळूच्या मोठा भागावर इजा झालेल्या होत्या, कवटीच्या पुढील व बाजूच्या भागाला गंभीर फ्रॅक्चर होऊन मेंदूचा काही भाग उघडा पडला होता. चेहऱ्याच्या हाडांनाही गंभीर दुखापत झाली होती. शस्त्रक्रियेदरम्यान जखमेची काळजीपूर्वक तपासणी करून ती पूर्णपणे स्वच्छ केली. मृत ऊती काढून टाकल्या. कवटीच्या फ्रॅक्चरची दुरुस्ती करून टाळूचा निखळलेला, मात्र जिवंत असलेला भाग जतन केला. टाळूची पुनर्रचना करण्यासाठी मागील बाजूस आधार असलेल्या ‘स्कॅल्प फ्लॅप’ तंत्राचा वापर केला. त्यामुळे कवटीचा उघडा भाग आणि त्याची दुरुस्ती झालेल्या जागेला तणावमुक्त व पुरेसा रक्तपुरवठा असलेले आवरण मिळाले. टाळूच्या मागील भागातील रक्तवाहिन्यांचा रक्तपुरवठा कायम राखण्यात आला.रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक सर्जन डॉ. सागर भुतडा, न्यूरोसर्जन डॉ. अभिजीत बेले, भूलतज्ज्ञ डॉ. दीपाली देशमुख, डॉ. अश्विनी मडावी, अधिसेविक चंदा खोडके व मालती प्रधान, इन्चार्ज सिस्टर दीपाली देशमुख, मनीषा रामटेके, दीपिका वाठोडकर, राहुल वायझाडे, शुभम गवई, विजय गवई, अभिजित निचत, यश गवई, सुमित शिरसाट, राहुल कावनपुरे, नंदलाल राठोड, साकिबभाई, ज्ञानेश लांजेवार यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. मोठ्या प्रमाणातील ऊतींचे नुकसान, कवटीला झालेली उघडी इजा, मेंदूचा भाग उघडा पडणे आणि वन्यप्राण्याच्या हल्ल्यामुळे संसर्गाचा वाढलेला धोका यामुळे हे प्रकरण वैद्यकीयदृष्ट्या आव्हानात्मक होते. मात्र, तज्ज्ञांच्या समन्वयातून शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली, असे मत सुपर स्पेशालिटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांच्याकडून कळले. वैद्यकीयदृष्ट्या आव्हानात्मक शस्त्रक्रिया



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *