![]()
इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन चिमुकलीस आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना केज तालुक्यात समोर आली आहे. या प्रकरणी पीडित बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दोन तरुणांसह जाब विचारण्यास गेलेल्या तिच्या आईला बेदम मारहाण करणाऱ्या नातेवाइकांवर, अशा एकूण चार जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील एका गावातील इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या (वय 6 वर्षे 10 महिने 26 दिवस) बालिकेला संशयित आरोपी वैभव विष्णू अंबाड आणि मयूर चंद्रकांत अंबाड (दोघे रा. लाडेगाव, ता. केज) यांनी 1 मे 2026 ते 19 ऑगस्ट 2026 या कालावधीत वेळोवेळी घरी बोलावून घेतले. तिच्या बालमनाचा गैरफायदा घेत तिला विविध गोष्टींचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित बालिकेची आई आरोपींच्या घरी जाऊन जाब विचारू लागली. त्यावेळी आरोपींच्या नातेवाइकांनी, लक्ष्मण नरसू अंबाड आणि चंद्रकांत लक्ष्मण अंबाड (दोघे रा. लाडेगाव) यांनी पीडितेच्या आईला बेदम मारहाण केली. या प्रकरणी पीडित आईने दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात वैभव अंबाड, मयूर अंबाड, लक्ष्मण अंबाड आणि चंद्रकांत अंबाड या चौघांविरुद्ध पोक्सो सह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हे ही वृत्त वाचा पुण्यात अमली पदार्थ देऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार:मारहाण अन् जिवे मारण्याची धमकी देत शिरूरच्या लॉजमध्ये डांबून ठेवले, 7 जणांवर गुन्हा दाखल
पुण्यातील शिरूर शहरात एका 22 वर्षीय तरुणीवर अमली पदार्थ देऊन सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून तरुणीला एका लॉजमध्ये डांबून ठेवण्यात आले आणि जबरदस्तीने अमली पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 22 वर्षीय तरुणी ही मूळची छत्तीसगड येथील रहिवासी असून ती सध्या पुण्यात चाकण परिसरात वास्तव्यास आहे. वाचा सविस्तर
Source link