Headlines

आईने 2 चिमुकल्यांना गळफास देऊन स्वतःही संपवले जीवन:कोल्हापूरच्या जयसिंगपूरमधील काळीज पिळवटून टाकणारी घटना




जयसिंगपूर शहरातील मच्छी मार्केट परिसरातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या दोन निष्पाप चिमुकल्या मुलांना गळफास लावून स्वतःही आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेत आईसह दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. संगीता गाडीवडर, मुलगी प्रगती आणि मुलगा प्रतीक अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत. शनिवारी रात्री हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संगीता यांचे काका दत्ता हे शनिवारी सायंकाळी कामावरून घरी परतले. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी बराच वेळ हाक मारूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी चार वर्षांची प्रगती आणि दीड वर्षाचा प्रतीक हे ओढणीच्या साहाय्याने, तर संगीता या साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. पती-पत्नीतील वादातून घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. यावेळी आरोग्य केंद्राबाहेर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. जयसिंगपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी आईने दोन्ही मुलांना गळफास दिल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे. घटनेच्या दिवशी दुपारी पती-पत्नीमध्ये वाद झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. संगीता यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या दडपणातून उचलले, याचा सर्व बाजूंनी सखोल तपास जयसिंगपूर पोलिस करत आहेत.

हे ही वृत्त वाचा

चुलत बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधातून पुतण्याचा काका-काकूंवर गोळीबार:गोळी डोळ्याला घासून गेल्याने आजोबा गंभीर जखमी, बीडमधील घटना

परळी तालुक्यातील खोडवासावरगाव तांडा येथे चुलत बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या वादातून एका तरुणाने आपल्या काका, काकू आणि आजोबांवर बंदुकीतून अंधाधुंद 3 ते 4 गोळ्या झाडून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली. या गोळीबारात गोळी डाव्या डोळ्याला घासून गेल्याने आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *