Headlines

बीडमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत:घरासमोर खेळणाऱ्या 3 वर्षीय चिमुकलीवर हल्ला; चेहऱ्याला पडले 12 टाके




बीड शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धांडे नगर भागातील शिवतेज नगरमध्ये घरासमोर खेळत असलेल्या अवघ्या 3 वर्षांच्या एका चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला करत तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चेहऱ्याला पडले 12 टाके शिवांशी घोलप असे या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 3 वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. या भीषण हल्ल्यात चिमुकलीच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून, तिच्या चेहऱ्यावर तब्बल 12 टाके घालावे लागले आहेत. सध्या शिवांशीवर नगर नाका परिसरातील जनाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, आपल्या मुलांना घराबाहेर खेळायला पाठवतानाही पालकांना आता मोकाट कुत्र्यांची धास्ती वाटू लागली आहे. नगरपालिकेच्या कारभारावर संताप विशेष म्हणजे, शहरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या महिन्यातही धानोर रोड परिसरात घराच्या दारात उभ्या असलेल्या एका लहान मुलीवर कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केला होता. कुत्र्यांनी तिला दारातून ओढत रस्त्यापर्यंत नेल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला होता. याव्यतिरिक्त, गेल्या आठवड्यात मोमीनपुरा पेठ भागातही मोकाट कुत्र्यांनी अनेक नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. वारंवार अशा घटना घडत असतानाही नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई का केली जात नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी शहरात अशा भयानक घटनांचे सत्र सुरूच असल्याने बीड नगरपालिका प्रशासन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलत आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करून मोकाट कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा आणि लहान मुले, शाळकरी विद्यार्थी व सर्वसामान्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे. हेही वाचा.. भाजप म्हणजेच पेड इव्हेंट: राहुल गांधींच्या कार्यक्रमावरील आरोपांवर संजय राऊतांचा पलटवार, फडणवीसांच्या नागपुरातील कार्यक्रमावरही निशाणा पुण्यात पार पडलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला भाजपने ‘पेड इव्हेंट’ म्हटल्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत खरपूस समाचार घेतला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांचा आजचा नागपूरमधील ‘जेन झी’ मेळावा आणि राज्य सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना हे दोन्ही ‘पेड इव्हेंट’ असल्याचे म्हणत सत्ताधाऱ्यांवर जोरदार पलटवार केला. तसेच, शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचारावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *