![]()
येथील स्व भास्करराव शिंगणे कला, प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट सेल व इंडस्ट्री इंटरॅक्शन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रोजी पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी कॅम्पसपासून कॉर्पोरेट पर्यंतच्या टेक्निकल
.
यावेळी मार्गदर्शन करताना अमोल एस. शेळके यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक मुलाखतीच्या तयारी बाबत सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयीन अभ्यासक्रम आणि उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा यांच्यामधील दुवा म्हणून अशा अतिथी व्याख्यानांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तांत्रिक मुलाखतीमध्ये यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण व नियोजनबद्ध सराव, प्रभावी संवादकौशल्य, प्रकल्पाधारित अनुभव आणि विषयाचे सखोल ज्ञान आवश्यक असून आत्मविश्वास आणि कौशल्याधारित ज्ञान हे कॉर्पोरेट क्षेत्रातील यशाची प्रमुख गुरुकिल्ली आहे,” असे त्यांनी नमूद केले.
पुढे बोलताना विद्यार्थ्यांनी मुलाखतीची तयारी ही केवळ एका परीक्षेप्रमाणे न करता सतत कौशल्य विकसित करण्याची प्रक्रिया म्हणून केली पाहिजे, असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
या व्याख्यानामध्ये कॅम्पस तसेच ऑफ-कॅम्पस मुलाखतींची तयारी, तांत्रिक प्रश्नांचा सराव, योग्य तयारीचा आराखडा, आवश्यक संसाधने, रेझ्युम तयार करण्याची पद्धत, संवादकौशल्य आणि मुलाखतीदरम्यान होणाऱ्या सामान्य चुका याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध नामांकित कंपन्यांच्या निवड प्रक्रियेबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नीलेश ताले यांनी तर सूत्रसंचालन उमेश ए. गुंजकर यांनी तर एन. के. मिसाळ यांनी आभार प्रदर्शन केले.