![]()
प्रतिनिधी | अहिल्यानगर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या जिल्हा गुंतवणूकदार परिषदेत शुक्रवारी ८३ उद्योगांनी तब्बल १३ हजार १७३ कोटी ७१ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले. या गुंतवणुकीमुळे सुपा, शिर्डी, श्रीरामपूर आणि नेवासा या औद्योगिक क्षेत्रांत तब्बल ११ हजार ९४८ नवीन रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे अहिल्यानगरच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप मिळण्याची शक्यता आहे. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत ही परिषद पार पडली. परिषदेला २०७ उद्योजकांनी सहभाग नोंदविला. आमदार काशीनाथ दाते, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उद्योग विभागाच्या सहआयुक्त वृषाली सोने, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर, उपाध्यक्ष प्रकाश गांधी, आमीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, उद्योग अधिकारी अशोक बेनके, शाम बिराजदार, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते आदी उपस्थित होते. उद्योगांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून दिल्यानंतर संरक्षण क्षेत्राशी संबंधित निबे उद्योग समूहाचा प्रकल्प जिल्ह्यात येणार आहे. भविष्यात बेलवंडी आणि हरेगाव येथेही संरक्षण क्षेत्रातील उत्पादन निर्मितीचे प्रकल्प सुरू होणार आहेत. यापूर्वी जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे औद्योगिक विकासात जिल्हा मागे राहिला. धाक आणि दडपशाहीमुळे काही उद्योग माघारी गेले, अशी टीका पालकमंत्री विखे यांनी परिषदेत केली. यंदा १० हजार ६७३.७१ कोटींची अतिरिक्त गुंतवणूक अहिल्यानगरच्या औद्योगिक विकासाने यंदा मोठी मजल मारली आहे. २०२५ मध्ये जिल्ह्यात सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. त्या तुलनेत यंदा तब्बल १० हजार ६७३.७१ कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक झाली आहे. परिणामी, गुंतवणुकीत ४२६.९४ टक्क्यांची वाढ झाली असून, यंदाचा एकूण गुंतवणुकीचा आकडा १३ हजार १७३.७१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. अहिल्यानगर होणार ‘ग्रोथ’ निर्मितीचे केंद्र ^यंदा एक कोटीपासून ५०० कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीचे प्रकल्प आले आहेत. या गुंतवणुकीचे परिणाम पुढील चार वर्षांत दिसतील. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. भविष्यात अहिल्यानगर जिल्हा ‘ग्रोथ’ निर्मितीचे केंद्र बनेल.” – अरविंद पारगावकर, अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स. ‘धाक-दडपशाहीमुळे उद्योग माघारी गेले’ या उद्योगांची मोठी गुंतवणूक { निबे ग्रुप : १० हजार कोटी रुपये जानगंगा { मल्टिस्टेट मल्टिपर्पज : ७५० कोटी रुपये { कार्लसबर्ग : ५०० कोटी रुपये { अॅडव्हानटेक फ्युएल सिस्टीम्स : ४०० कोटी रुपये { एस-फॉर्म : ४०० कोटी रुपये
Source link
अहिल्यानगरच्या उद्योगविश्वाला बूस्टर; 13 हजार कोटींची विक्रमी गुंतवणूक:83 उद्योगांचे करार;सुपा, शिर्डीत 11 हजार 948 रोजगारांची निर्मिती