Headlines

आधुनिक भारताच्या उभारणीत राजीव गांधींचे योगदान- देशमुख:माजी पंतप्रधान राजीव गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन‎




भारताचे माजी पंतप्रधान तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त येथील काँग्रेस भवनात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी बोलताना बबलू देशमुख म्हणाले की, दिवंगत राजीव गांधी यांनी देशाच्या विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत भारताला नव्या युगाकडे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. युवकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय, संगणक व दूरसंचार क्षेत्राला चालना तसेच पंचायतराज व्यवस्थेला बळकटी देण्यासारखे दूरदृष्टीचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या आधुनिक आणि प्रगतिशील विचारांमुळे भारताच्या विकासाला नवी दिशा मिळाली. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले. राजीव गांधी यांनी देशाची एकात्मता, प्रगती आणि विकासासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करावा आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचविण्यासाठी कार्य करावे, असे आवाहनही बबलू देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला हरिभाऊ मोहोड, प्रकाश काळबांडे, संजय वानखडे, प्रदीप देशमुख, समाधान दहातोंडे, शैलेश गवई, सिद्धार्थ बोबडे, प्रशांत भोयर, धनंजय देशमुख, शेखर दाभणे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी दिवंगत राजीव गांधी यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. या वेळी पदाधिकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *