![]()
2024 मध्ये सुद्धा नीटचा पेपरफुटला होता पण तरीही त्या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याला भाजपशासित राज्याचे चीफ सेक्रेटरी म्हणून बढती देण्यात आली. त्यामुळे त्या विभागातील लोकांचे धाडस वाढले आणि 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात पेपर फुटला, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. तर ज्या अधिकाऱ्याला जबाबदार धरायला पाहिजे होते त्यांना बढती मिळाल्याने त्यांचे धाडस वाढले, म्हणून पुन्हा 2026 मध्ये पेपर फुटला. नीट पेपर फुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना सरकारने मदत केली पाहिजे. रोहित पवार म्हणाले की, अमोल मिटकरी यांना आमदारकी मिळाली पाहिजे होती ही सर्वांची भावना होती, पण त्यांना संधी देण्यात आली नाही. मिळाले कोणाला तर कोकणातील नेत्याच्या मुलाला आणि भाईजींच्या दिवानजींना संधी मिळाली आहे. अजित पवार नाराज असलेल्या नेत्यांनाच आज ताकद दिली जात असेल तर मग संदेश असा जातो की पक्षाच्या अध्यक्षांचे काही चालत नाही इतर नेत्यांचे चालते. आता संघर्षांचा काळ आहे यात खरी भूमिका घेण्याची गरज आहे. लोकांसाठी लढणे गरजेचे आहे, पण काही लोकांना सत्ता जास्त गरजेची आहे असा टोला अजित पवार गटातील नेत्यांना नाव न घेता लगावला आहे.
अजितदादांच्या अपघाताचा पाठपुरावा सुरू रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघाताचा पाठपुरावा माझ्यासह अजित पवार गटातील नेते सुद्धा करत आहेत. त्यामध्ये पत्रकारांची खूप मोठी साथ आम्हाला लाभते आहे. सर्वच जण खराब असतात असे नाही काही अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य सुद्धा केले त्यामुळे आम्ही इथेपर्यंत आलो आहोत. पत्रकारांना अर्वाच्च भाषेत बोलणं चुकीचे रोहित पवार म्हणाले की, लोकशाही टिकण्यामध्ये पत्रकारांचा खूप मोठा वाटा आहे. पत्रकार प्रश्न विचारत असताना त्यांना अर्वाच्च भाषेत बोलणं चुकीचे आहे. कोणीही खालच्या पातळीवर जात वक्तव्य करत असेल तर आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो. संजय दिना पाटील यांचा स्वभाव वेगळा असला तरी असे बोलणं योग्य नाही. कुठलाही नेता कितीही मोठा असला तरी सुद्धा त्यांनी शब्दांवर कंट्रोल ठेवला पाहिजे. संजय दिना पाटील यांनी काय केले कसे केले हे माहिती नाही.
Source link