Headlines

मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी:पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मध्यरात्री अज्ञाताचा फोन, सुरक्षा यंत्रणा अलर्ट




मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बॉम्बस्फोटाची धमकीचा फोन आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दिल्ली पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून मुंबईत आज बॉम्बस्फोट घडवून आणला जाणार असल्याचा दावा केला आणि त्यानंतर तात्काळ फोन कट केला. दिल्ली कंट्रोल रूमला आला होता फोन मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने थेट दिल्ली पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला होता. या व्यक्तीने “आज मुंबईत मोठा बॉम्ब ब्लास्ट केला जाणार आहे,” असे फक्त एकच वाक्य उच्चारले आणि त्वरित फोन कट केला. अशी सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दिल्ली पोलिसांनी तातडीने महाराष्ट्र पोलिस आणि मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि त्यांना या धोक्याची पूर्वकल्पना दिली. आरोपीचा फोन बंद, शोध मोहीम सुरू दिल्ली पोलिसांकडून माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी त्या अज्ञात व्यक्तीच्या फोन नंबरवर संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, त्या व्यक्तीचा फोन सतत बंद येत आहे. हा फोन कोणी आणि कुठून केला होता, याचा शोध आता पोलिसांच्या सायबर टीम आणि गुन्हे शाखेकडून युद्धपातळीवर घेतला जात आहे. महत्त्वाची कार्यालये आणि प्रार्थनास्थळांवर सुरक्षा वाढवली या धमकीच्या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. शहरातील सर्व महत्त्वाची सरकारी कार्यालये, गर्दीची ठिकाणे आणि प्रमुख प्रार्थनास्थळे असलेल्या ठिकाणी पोलिसांना सतर्क राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली आहे. हे ही वाचा.. राम मंदिर देणगीवरून संजय राऊत आक्रमक:मंदिरासाठी दिलेली चांदीची वीट कुठे? पावतीही नाही, चौकशीची मागणी अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या ४ किलो चांदीच्या विटेचा ठावठिकाणा अद्याप समोर न आल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर ट्रस्टवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *