![]()
खवड्या डोंगरावर मुलासह पती-पत्नीने जीवन संपवल्यामागे केवळ मोबाइलचे हप्ते हे एकमेव कारण नसून 2 दशकांचा कौटुंबिक कलह असल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबीयांच्या संपर्कात नसलेले मृत मुरलीधर चांदगुडे यांनी मागील 4 महिन्यांपासून आई-वडील व बहिणींशी संपर्क वाढवला होता. यावरून पत्नी संगीता व मुलगा कुणाल यांच्यासोबत त्यांचे वाद सुरू झाले. त्यानंतर पत्नी व मुलाने त्यांना घराबाहेर काढल्याचा दावा बहिणीने केला आहे. ‘दिव्य मराठी’ने रविवारी (23 आॅगस्ट) मुरलीधर यांचे मूळ गाव धनगर पिंपळगाव (ता. अंबड) येथे जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली असता बहीण शोभा मस्के यांनी अनेक बाबींचा उलगडा केला. घटनेनंतर घाटी रुग्णालयात दोन्ही बाजूंच्या नातेवाइकांमध्ये वाद झाला. यामुळे मुरलीधर यांच्यावर गावी तर पत्नी व मुलावर मुकुंदवाडीत अंत्यसंस्कार केले. मात्र, रविवारी दोन्ही कुटुंबांचे नातेवाईक अस्थी घेऊन पैठणला पोहोचले.गोदावरीत तिघांच्या अस्थींचे एकत्र विसर्जन केले. महिनाभरापासून मुरलीधर घराबाहेर वाढलेल्या वादानंतर मुरलीधर महिनाभरापासून पत्नीसोबत राहत नव्हते. तरीही कुणालच्या ट्यूशनचा खर्च, मोबाइल व घरभाड्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती. काही दिवसांपूर्वी कर्जमाफीच्या कामासाठी ते गावी आले तेव्हा त्यांनी बायको-मुलाने शिवीगाळ करून मला घराबाहेर काढले आहे, असे बहिणीला सांगितले होते. लग्नाला गेल्याने वाद 4 महिन्यांपूर्वी एका भाच्याच्या लग्नाला मुरलीधर आले, मात्र संगीता आल्या नाहीत. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मधल्या बहिणीच्या मुलाचे निधन झाले. त्यामुळे मुरलीधर तेथे 10 दिवस थांबले. हे संगीताला खटकले. त्यातून वाद झाला. शिवीगाळ करत मुरलीधर यांना घराबाहेर काढल्याचा आरोप शोभा यांनी केला आहे. 80 वर्षांची आई अद्यापही सुन्न मुरलीधर हे 85 वर्षांचे वडील आणि 80 वर्षांच्या आईचा एकुलता आधार होते. ‘तू काही करू नको, आम्ही आई-बापाचे बघून घेऊ, फक्त बोलत जा,’ अशी विनंती बहिणींनी केली होती. अबोल मुलगा गेल्याने वृद्ध आईला शोक अनावर झाला आहे. गावावरही शोककळा आहे. प्रेमविवाहानंतर दुरावा मुरलीधर हे आई-वडिलांचे एकुलते एक होते. त्यांचा संगीतासोबत प्रेमविवाह झाला. संगीता शेतीची कामे करणार नाही म्हणून घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर हे जोडपे संभाजीनगरला आले. 17-18 वर्षांपासून मुरलीधर यांचा आई-वडील व बहिणींशी संपर्क नव्हता. शैलेश माने यांनी स्वीकारले शेरू श्वानाचे पालकत्व प्राणिमित्र शैलेश माने यांनी चांदगुडे यांच्या ‘शेरू’ नावाच्या कुत्र्याचे पालकत्व स्वीकारले. त्यांच्याकडे आधीच अपघातग्रस्त 10-12 कुत्रे आहेत. त्यांच्यासोबत शेरू खेळला असून तो जेवल्याचे त्यांनी सांगितले. मीडियावर व्हिडिओ व्हायरल संगीता यांच्या बहिणीकडून कुटुंबाची बदनामी न करण्याचे आवाहन करणारे व्हिडिओ टाकण्यात येत आहेत. या घटनेचे दुसरे कारण लवकरच समोर येईल, असा व्हिडिओ संगिता यांच्या बहिणीने पोस्ट केला.
Source link
दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:17 वर्षांनंतर आई, वडील, बहिणींशी चांदगुडेंनी संपर्क वाढवल्याने घरात वाद, पत्नी आणि मुलाने घराबाहेर काढल्याचा बहिणीचा दावा