![]()
टोलनाक्यावर वाद झाल्याची माहिती ११२ या क्रमांकावर मिळाली होती. त्या ठिकाणी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याची घटना अंबड तालुक्यातील माळीवाडी टोलनाक्यावर २२ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आसिफ कय्युम शेख (पाचोड) याच्यासह तीन अनोळखींवर गुन्हा दाखल आहे. अंमलदार पवन बळीराम चव्हाण (३२) यांनी अंबड ठाण्यात तक्रार दिली आहे. टोलनाका परिसरात ५० ते ६० जणांचा जमाव जमला होता. संशयित आसिफ कय्युम शेख याच्यासह सोबतच्या तीन अनोळखींनी चव्हाण यांची कॉलर पकडत धक्काबुक्की केली. माळीवाडी टोलनाक्यावर तरुणांनी गोंधळ घालत पोलिसाला मारहाण केली. टोलनाक्यांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर : राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या या प्रकारामुळे रात्रीच्या वेळी टोलनाक्यांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांवरच हल्ला झाल्यामुळे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, अंबड पोलिसांकडून आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Source link
टोलनाक्यावर वाद सोडवण्यास आलेल्यापोलिस कर्मचाऱ्यास तरुणांकडून मारहाण:माळीवाडी टोलनाक्यावरील घटना, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू