![]()
तालुक्यातील चारठा येथे शनिवारी शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार संदीपान भुमरे यांनी शिवसेना जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन पठाडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांच्या नेतृत्वाला मोठे बळ दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कार्यक्रमास खासदार संदीपान भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हाप्रमुख रमेश पवार, संचालक गणेश दहिहांडे, पुनमभाऊ बमणे, तालुकाप्रमुख मनोज शेजूळ, माजी उपसभापती अर्जुन शेळके, पंचायत समिती सदस्य पूजाताई घोडके, अर्चना बोंगाणे व उपतालुकाप्रमुख आप्पासाहेब बोचरे आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात चारठा गावातील विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये ग्रामपंचायत इमारतीसाठी २० लाख रुपये, शनिदेव मंदिर संस्थान येथील सार्वजनिक सभामंडपासाठी २६ लाख रुपये, पाणी आर.ओ. प्लांट व शेडसाठी ७.२० लाख रुपये तसेच सिमेंट बंधाऱ्यासाठी १३.६७ लाख रुपये अशा एकूण लाखो रुपयांच्या कामांचा समावेश आहे. या विकासकामांमुळे गावातील मूलभूत सुविधांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून ग्रामस्थांनी याचे स्वागत केले. तसेच नवीन शाखा उद्घाटनामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या सोहळ्यास सरपंच प्रयागबाई बोचरे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
चारठा येथे विकासकामांचे लोकार्पण:ग्रामपंचायत इमारतीस 20 लाखांचा निधी, शिवसेना शाखेचे उद्घाटन