Headlines

अजरामर गाणी, गझलांनी नगरकर रसिक मंत्रमुग्ध!:गुलजारनामा मैफलीला नगरकरांची मिळाली उत्स्फूर्त दाद; गाणी, शायरीने वाढली रंगत‎



स्वरांची नजाकत, शब्दांची तरलता आणि भावनांची हळुवार स्पंदने यांचा सुरेल मिलाफ अनुभवण्याची अनोखी पर्वणी नगरच्या रसिकांना ‘गुलजारनाम’ या संगीत मैफिलीत लाभली. हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतकार, कवी, पटकथाकार आणि दिग्दर्शक गुलजार यांच्या अजरामर गाण्यांनी, गझल

.

ज्येष्ठ गीतकार गुलजार यांचा नुकताच झालेल्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त आरोही निर्मित झालेल्या या मैफलीत गायक हृषिकेश रानडे व स्वप्नजा लेले यांनी गुलजार यांच्या गीतांमधील प्रेम, विरह, नात्यांची ऊब आणि जीवनातील भावछटा आपल्या मधुर स्वरांनी उलगडल्या. या मैफलीत बहारदार गीतांचे सादरीकरण व गुलझार यांच्या प्रसिद्ध कविता आणि शायरीचे सादरीकरण कवी गीतकार वैभव जोशी यांनी केले. या मैफलीचे तितकेच रंगतदार व दर्जेदार निवेदन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. ज्येष्ठ संगीत संयोजक अविनाश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात नावाजलेल्या वादकांनी गायकांना उत्कृष्ट संगीत साथ दिली. याचवेळी रंगमंचावर चित्रकार प्रमोद कांबळे यांनी गुलजार यांचे लाईव्ह रेखाचित्र रेखाटून या मैफलीला अविस्मरणीय केले.

विचार भारतीचे माजी अध्यक्ष अरुण कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत करून विचार भारतीच्या कार्याचा थोडक्यात गोषवारा केला. विचार भारतीचे अध्यक्ष सुधीर लांडगे, रवींद्र मुळे, अनंत देसाई, मनोज झंवर, उदय भणगे, सुनील नागोरी, गिरीश अग्रवाल, गौतम मुनोत, अरविंद पारगावकर, मिलिंद गंधे, निनाद टिपुगडे यांनी कलाकारांचा सन्मान केला. तसेच राजेश झंवर, यश निंबाळकर, श्रेयस लहामगे, राहुल भगत यांनी सहकार्य केले. चित्रकार प्रमोद कांबळे यांनी रेखाटलेले गुलजार यांचे चित्र गीतकार वैभव जोशी यांना भेट दिले.

नगरकर रसिकांची टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिल ढूंढता है… या गाण्याने ऋषिकेश रानडे यांनी या मैफलीची सुरुवात केली. त्या पाठोपाठ रानडे व स्वप्नजा लेले यांनी गाजलेल्या गाण्याचे बहारदार सादरीकरणास उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली. तुझसे नाराज़ नहीं, सुरमयी अखियों में, यारा सिली सिली या गंभीर गाण्यांनी काहीसे भारावलेल्या सभागृहाला जंगल बुक टायटल साँग जंगल जंगल बात चली है व लकड़ी की काठी या उडत्या चालीच्या गाण्यांनी प्रफुल्लित केले. तसेच कजरा रे कजरा रे, चप्पा चप्पा चरखा चले व सपने में मिलती है या गाण्यांवर शिट्यांची बरसात झाली. ऐ वतन मेरे वतन आबाद रहे तू या देशभक्तीपर गीताने या मैफलीची सांगता झाली. गायक व वादक कलाकारांना रसिकांनी उभे राहून टाळ्यांनी मानवंदना दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *