Headlines

अखंड हरिनाम सप्ताहामधून घडले अध्यात्म अन् सेवाभावाचे खरे दर्शन:राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथील हरिनाम सप्ताहासाठी 101पोती साखर‎



राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सदगुरू महंत गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्यावतीने १०१ साखर पोती सप्ताह कमिटीकडे सुपूर्त करण्यात आली. धनगरवाडी येथे आयोजित करण्यात आलेला अखंड

.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून यंदाच्या सप्ताहामध्ये योगदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.विखे पाटील परिवाराने जिल्ह्यातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांसह वारकरी सांप्रदायामध्ये नेहमीच योगदान आणि सहकार्य करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. धनगरवाडीतील या भक्तिमय सोहळ्यालाही कारखान्याच्या माध्यमातून मोलाचे सहकार्य करण्यात आले.

यावेळी विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सोपान शिरसाठ, एम.डी. महेश कोनापुरे, संचालक लाटे, ताठे, यादव यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि सप्ताह कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून धनगरवाडी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून सप्ताह कमिटीकडे करण्यात आलेल्या या सहकार्याबद्दल आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

धनगरवाडी येथे सप्ताह घेण्याचा निर्णय झाल्यानंतर या गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांच्या कामासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ४ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करून रस्त्यांची काम मार्गी लावली. यामुळे लाखो भाविकांना येणे सोयीस्कर झाले. याबद्दल महंत रामगिरी महाराज यांनी मंत्री विखे पाटील यांचे जाहीर अभिनंदन करून आभार मानले.

या सोहळ्यासाठी भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे. या ठिकाणी दररोज लाखो भाविकांना आमटी आणि भाकरीचा महाप्रसाद देण्यात येतो. यासाठी नागरिकांकडून भाकरी दिल्या जातात तसेच सप्ताहाच्या ठिकाणी लाखो लिटर आमटी तयार केली जाते.

लाखो भाविकांना दररोज आमटी भाकरीचा महाप्रसाद या सोहळ्यासाठी भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे. या ठिकाणी दररोज लाखो भाविकांना आमटी आणि भाकरीचा महाप्रसाद देण्यात येतो. यासाठी नागरिकांकडून भाकरी दिल्या जातात तसेच सप्ताहाच्या ठिकाणी लाखो लिटर आमटी तयार केली जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *