Headlines

माउलींच्या जन्मभूमीचा कायापालट; विठ्ठल मूर्ती व परिसराचे सुशोभीकरण:आपेगाव भक्ती आणि पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होणार‎



पैठण तालुक्यातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मभूमी आपेगावचा तीर्थक्षेत्र व पर्यटनाच्या दृष्टीने कायापालट होत असून, सुमारे १७ कोटी रुपयांच्या विकासकामांतुन गती मिळाली आहे. पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून १२ कोटी, तर महाराष्ट्र पर्यटन वि

.

आपेगाव येथे २४ फुटांची भव्य विठ्ठल मूर्ती उभारण्यात आली असून ती भाविकांसाठी आकर्षण ठरत आहे. माउलींच्या जन्मस्थळाचा विकास आणि परिसराची भव्यता भक्तांसाठी सुखद अनुभव देणारी ठरत आहे. आपेगावच्या विकासासाठी आमदार विलास भुमरे यांनी विशेष लक्ष घालून विविध विकासकामांचे नियोजन केले आहे.

तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास साधून भाविकांना आवश्यक सुविधा देण्याबरोबरच पर्यटनवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत, यामुळे आपेगावच्या विकासाला आणखी चालना मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र बोरकर यांनी सांगितले.

१७ कोटींची विकासकामे आपेगाव येथे नदीघाटासाठी ५ कोटी रुपये, भक्तनिवासासाठी २ कोटी ४६ लाख, प्रसादालयासाठी २ कोटी १० लाख, बहुउद्देशीय सभागृहासाठी २ कोटी २० लाख, शौचालयासाठी ३० लाख, तर स्तंभ उभारणीसह इतर कामांसाठी ३ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून करुन देण्यात आली असल्याचे अभियंता राजेंद्र बोरकर यांनी सांगितले.

वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होईल Ã पैठण तालुक्यातील आपेगाव तीर्थक्षेत्राचा लवकरच व्यापक विकास होईल. राज्य भरातील भाविक-भ क्त, वारकऱ्यांना येथे सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विकासकामांमुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. -विलास भुमरे, आमदार, पैठण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *