Headlines

मन:शांतीसाठी प्रत्येकाने स्वीकारावा परमार्थ मार्ग:मानुर येथे सप्ताहात राजराजेश्वरी दीदींचे निरुपण‎




परमेश्वराच्या दर्शनाने मनाची चंचलता संपून ते चरणी स्थिरावते. जगातील सुख-दुःख, भूक-तहान यांचा विसर पडतो आणि अहंकार नष्ट होतो. त्यामुळे नागरिकांनी संसारासोबत परमार्थाची जोड द्यावी, असा संदेश राजराजेश्वरी दीदी बिलमाळ यांनी कीर्तनातून दिला. तालुक्यातील मानूर येथील हनुमान मंदिरात सुरू असलेल्या कीर्तन सप्ताहात राजराजेश्वरी दीदी यांनी पाचवे पुष्प गुंफले. आजची सेवा लता पवार, कडू पवार यांच्या वतीने झाली. संत तुकाराम महाराजांच्या ‘रुपी जडले लोचन । पायी स्थिरावले मन’ या अभंगाचे निरूपण करताना त्यांनी विठ्ठलभक्तीचा भाव ओघवत्या वाणीने मांडला. विठ्ठलरूपी ओढ लागली की मन कधीच मागे जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. समाजातील मोबाईलचा वाढता अतिरेक, व्यसनाधीनता, अपघात आणि आत्महत्यांच्या घटनांवरही त्यांनी प्रकाश टाकला. या सर्व समस्यांवर मनशांती हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. हनुमान मंदिरात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहामुळे संपूर्ण परिसरात चैतन्यमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. दीदींच्या कीर्तनावेळी उपस्थितांनी टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा-तुकाराम’च् या जयघोषात ठेका धरला. कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ, महिला वर्ग आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. , सायंकाळच्या सत्रातील विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *