Headlines

श्री संत सावता माळी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा:महाविद्यालयाच्या विकासात योगदान देण्याचा माजी विद्यार्थ्यांचा संकल्प




फुलंब्री येथील श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच पार पडला. पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था संचलित या महाविद्यालयात रविवारी (२३ ऑगस्ट) रोजी माजी विद्यार्थ्यांची बैठक व एकत्रीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य डॉ. सुभाष टकले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. महेश थोरात, प्रा. डॉ. नितीन माळेगावकर, प्रा. डॉ. पांचाळ आणि प्रा. डॉ. सुरेश ढवळे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात २०११-१२ ते २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील वाणिज्य शाखेचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करत एकमेकांशी संवाद साधला. महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासात माजी विद्यार्थ्यांचे योगदान, मार्गदर्शन आणि भावी पिढीसाठी सहकार्य यावर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. या स्नेहसंमेलनाच्या वातावरणात पार पडलेल्या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या विकासात सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *