Headlines

कुर्डुवाडी पालिकेला वर्षभरापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळेना:कारभार ”प्रभारी”वर असल्याने धोरणात्मक निर्णय रखडले



कुर्डुवाडी नगरपालिकेचा कारभार गेल्या सुमारे एका वर्षापासून कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांविना सुरू असल्याने शहराच्या विकासाला जणू ब्रेक लागला आहे. सध्या पालिकेचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू असल्याने धोरणात्मक निर्णय घेण्यास मर्यादा येत असून, याचा थ

.

नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्याधिकारी हे अत्यंत महत्त्वाचे पद असते. शहराचे आर्थिक नियोजन, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्याचे काम मुख्याधिकाऱ्यांचे असते. मात्र, गेल्या वर्षभरापासून येथे कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने प्रशासकीय घडी पूर्णपणे विस्कटली आहे. अनेक महत्त्वाच्या फाईल्स मंजुरीअभावी पडून आहेत. संपूर्ण महिन्याभरात एक किंवा दोनवेळाच मुख्याधिकारी कुर्डुवाडी कार्यालयात येतात.

प्रभारी अधिकाऱ्यांना मूळ पद सांभाळून कुर्डुवाडीचा अतिरिक्त भार सांभाळावा लागत असल्याने, त्यांना शहराच्या समस्यांना पूर्ण वेळ देणे शक्य होत नाही. परिणामी, पालिकेत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. . अंदाजपत्रक केवळ कागदावर : पालिकेच्या अंदाजपत्रकीय तरतुदींनुसार नवीन विकासकामांच्या निविदा काढण्यास विलंब होत आहे. . कर्मचाऱ्यांवर वचक नाही : मुख्याधिकाऱ्यांच्या रोजच्या अनुपस्थितीमुळे पालिकेच्या विविध विभागांमधील प्रशासकीय शिस्तीला तडे गेले आहेत. एकीकडे शासन शहरांच्या विकासाचे मोठे दावे करत असताना, कुर्डुवाडीसारख्या महत्त्वाच्या रेल्वे जंक्शन आणि व्यापारी केंद्र असलेल्या शहराला वर्षभर मुख्याधिकारी देऊ नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी मंत्रालयात वजन वापरून कायमस्वरूपी सक्षम अधिकारी आणणे गरजेचे होते, मात्र अनास्थाच दिसून येत असल्याची चर्चा नागरिकांत आहे. कुर्डुवाडी शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत पाणीपुरवठा योजना, रस्त्यांची कामे, भुयारी गटार योजना, आणि शहरातील स्वच्छता या गोष्टींवर नियमित लक्ष ठेवणे गरजेचे आहे. परंतु, पूर्णवेळ नियंत्रण नसल्याने शहरात अनेक प्रभागांमधील रस्ते आणि पथदिव्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. नवीन घरबांधणी परवाने आणि शासकीय दाखल्यांसाठी नागरिकांना अनेक दिवस वाट पाहावी लागत आहे. काही महत्वाच्या फाईलवर सह्या हव्या असतील तर कर्मचाऱ्यांना करमाळा नगरपालिका कार्यालयात फाईल घेऊन बोलावले जाते. कर्मचाऱ्यांनाही महत्वाच्या कामांच्या फायली घेऊन मुख्याधिकारी करमाळा यांच्या कार्यालयाकडे जावे लागत आहे. यामध्ये विनाकारण कर्मचाऱ्यांची मधेच ससेहोलपट होताना दिसत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *