Headlines

पाणी, वीज पुरवठा सुरळीत,पण डीपीच जळत असल्याने पिकेही वाळू लागली:वटवटे येथे शेती पंपाचे वर्षभरात 10 ते 12 डीपी जळाले, शेतकऱ्यांचा टाहो



वटवटे (ता.मोहोळ) गावाजवळील महावितरणचा पाणी पुरवठा शेती डिपी वारंवार जळत असल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. वर्षभरात १० ते १२ डीपी जळाले आहेत. तक्रार करून ही अधिकाऱ्याकडून लक्ष दिले जात नाही. मागील ३ ते ४ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी अतिरिक्त डिपीची म

.

महावितरणच्या कामती (बू.) शाखा कार्यालयांतर्गत असलेल्या या गावाच्या शेतीला वीजपुरवठा करणारा पाणीपुरवठा या नावे असलेला शंभर केव्हीएचा डिपी आहे. परंतु प्रत्यक्षात या डीपीवर दीडशेहून अधिक अश्वशक्तीचा भार आहे. परिणामी सदरचा डिपी वारंवार जळत आहे. दोन दिवसांपूर्वीच (ता.१६) बसविलेला डीपी काल (ता. १८) सोमवारी पुन्हा जळाल्याने शेतकरी वर्गात महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. डीपी जळाल्याने विजेअभावी उभी पीके जळू लागली आहेत.

शिवाय जळालेला डिपी संबंधितांकडून वेळेत उपलब्ध होत नाही. शेतकऱ्यांनाच पदरमोड करून डिपीची ने- आण करणे, तो बसवण्यासाठी रकमेची व्यवस्था करावी लागत आहे. मागील ३ ते ४ वर्षांपासून अतिरिक्त डिपी मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र महावितरणकडून याबाबत कसलीच दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. जळालेला डीपी असा बसविला की तो पुन्हा जळतो, हा अनुभव शेतकऱ्यांना या वर्षभरात सुमारे १० ते १३ वेळा आला आहे.

डीपी जळाला की दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना वर्गणी काढावी लागते. महावितरणच्या सहकार्याने २ ते ३ डिपीचा अपवाद वगळता अन्य सर्व डीपी खासगी स्वरुपात शेतकऱ्यांनी स्वतः अव्वाच्या सव्वा रकमा खर्च करून ^अधिकारी खोटे बोलतात. मागील ३ ते ४ वर्षापूर्वी अतिरिक्त डिपी मागणीसाठी अर्ज देऊन पाठपुरावा केलेला आहे. शेतकऱ्याकडून वर्गणी गोळा करून खासगीतून डीपी भरून आणले आहे. महावितरणकडून दिलेल्या डीपीचा वाहतूक खर्च व तो बसवण्यासाठी मजुरीसाठी पैसे मोजले आहेत. बिरुदेव व्हनमाने, शेतकरी ^वर्षभरात एवढे डीपी जळालेले नाहीत. मी अडीच वर्षापासून या कार्यालयात कार्यरत आहे. अतिरिक्त डिपी मागणीचा अर्ज आपणाकडे आलेला नाही. तरीही हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. आकाश बचुटे, कनिष्ठ अभियंता, महावितरण आज सकाळी गावातील संतप्त शेतकऱ्यांनी डीपी मागणीसाठी महावितरण कार्यालयासमोर अचानक ठिय्या आंदोलन केले. यावेळी उपस्थित बिरुदेव व्हनमाने, शिवाजी मोटे, बाबा मुजावर, भगवान आसबे, पोपट सलगर, गोविंद कांबळे, राहुल गावडे, काशीनाथ सलगर, अशोक जाधव, हरिदास गावडे, शरद मोटे, केराप्पा गावडे, विठ्ठल गावडे आदी आंदोलनकर्त्यांनी महावितरण व अधिकाऱ्याच्या निषेधार्थ घोषणा देत संताप व्यक्त केला. करून आणले असल्याचे युवा कार्यकर्ते बिरुदेव व्हनमाने यांनी सांगितले.एकूणच या परिस्थितीमुळे शेतातील पिके जगवायची कशी असा प्रश्न सध्या शेतकऱ्यासमोर उभा आहे. दरम्यान महावितरणचे कनिष्ठ अभियंता आकाश बचुटे यांनी चालू मे महिन्यात ३ वेळा व तेही कार्यालयाच्या चुकीमुळे डीपी जळाले असल्याचे सांगितले. परंतु चालू वर्षभरात सुमारे दहा ते बारा वेळा डिपी जळल्याचा दावा शेतकरी वर्गातून केला जात आहे. विशेष म्हणजे परवा शनिवारी (ता.१६) नव्याने नवीनच बसवलेला डिपी काल ( ता. १८) सोमवारी पुन्हा जळाला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी असून ही वीज पुरवठ्याअभावी शेतकरी वर्गाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू

विजेअभावी शेती कशी करायची ^विजेअभावी शेती कशी करायची. यापेक्षा मजुरी केलेली बरी. सध्या पाणी असून ही डीपी पर्यायाने वीज समस्यांमुळे उभा ऊस जळू लागला आहे. महावितरण आणखी किती त्रास देणार आहे. विठ्ठल गावडे, शेतकरी, वटवटे

आज अचानक ठिय्या आंदोलन करून लक्ष वेधले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *