Headlines

ओढे, नालेसफाईच्या कामाला अखेर वेग:दिव्य मराठीच्या वृत्ताची‎ महापालिकेची दखल‎




पावसाळा अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरातील ओढे व नाल्यांची साफसफाई अत्यंत संथगतीने सुरू होती. प्रशासनाने ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला होता; मात्र प्रत्यक्षात अनेक नाल्यांमध्ये अर्धवट काम झाले होते. ”दिव्य मराठी”ने या बाबत वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधले. या वृत्ताची दखल घेत आयुक्त यशवंत डांगे यांनी नालेसफाईच्या कामाला तातडीने गती देण्याचे आदेश दिले. त्यानुसार कामाला सुरुवात झाली आहे. नालेसफाईच्या वृत्तानंतर बुधवारी सिव्हिल हडको परिसरात नालेसफाईच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे. तसेच, जिथे छोटी मशीन गाळात अडकत होती, तिथे आता मोठी मशीन मागवून नालेसफाई केली जात आहे. नालेसफाईसाठी जिथे मोठ्या मशीन जात नाहीत, तिथे छोट्या मशीन वापराव्यात. ज्या ठिकाणी मोठ्या मशीनची आवश्यकता असेल तेथे मोठे मशीन आणून नालेसफाई तात्काळ पूर्ण करावी. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन करून गरज पडल्यास मशीनची संख्या वाढवावी, असे निर्देश आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *