Headlines

राज्य पोलिस दलात प्रचंड फेरबदल:IPS आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या अन्‌ पदोन्नतीचे आदेश जारी; मुंबई, ठाणे, पुणे आणि नवी मुंबईत नव्या नियुक्त्या




राज्यातील प्रशासकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल करत अनेक वरिष्ठ आयपीएस (IPS) आणि राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या व पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. पोलिस स्थापना मंडळ क्र. १ च्या शिफारशींनुसार, तसेच कायदा-सुव्यवस्था, निवडणूक आचारसंहिता आणि न्यायालयीन निर्देशांचे तंतोतंत पालन करून हे आदेश काढण्यात आले आहेत. ऐनवेळी झालेल्या या मोठ्या खांदेपालटामुळे पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रशासकीय फेरबदलामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई यांसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील आणि ग्रामीण भागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या आहेत. ‘डीआयजी’ (DIG) दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल पोलिस उपमहानिरीक्षक (DIG) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी खालीलप्रमाणे आहे: शिवाजी राठोड नागपूर येथून त्यांची ठाणे शहरात अपर पोलिस आयुक्त (Additional CP) म्हणून बदली करण्यात आली आहे. प्रमोद शेवाळे एटीएस (ATS) पुणे येथून त्यांची नवी मुंबई गुन्हे शाखेत (Crime Branch) अपर पोलिस आयुक्त पदावर नियुक्ती झाली आहे. विनीता साहू यांच्याकडे मुंबई येथे एसआरपीएफ (SRPF) च्या डीआयजी (DIG) पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अशोक दुधे यांचीही ठाणे शहरात अपर पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. आर. राजा यांना वरिष्ठ श्रेणीत पदोन्नती (Promotion) देऊन मुंबईत अपर पोलिस आयुक्त म्हणून नेमण्यात आले आहे. मुंबई आणि ठाणे शहरात नवीन अधिकाऱ्यांची फौज शीला साईल यांची मुंबई शहरात पोलिस उपायुक्त (DCP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बाळासाहेब पाटील, विवेक पानसरे आणि निलेश सोनावणे या तीन ज्येष्ठ अधिकाऱ्यांची ठाणे शहरात बदली करण्यात आली आहे. श्रीकांत परोपकारी यांच्या खांद्यावर राज्याच्या तटीय सुरक्षा (Coastal Security) विभागाची अत्यंत संवेदनशील जबाबदारी देण्यात आली आहे. रविंद्र परदेशी यांची पुणे येथील एसआरपीएफ (SRPF) गट-१ च्या समादेशक (Commandant) पदावर नियुक्ती झाली आहे. ग्रामीण भाग आणि पुण्यात नव्या नियुक्त्या प्रकाश जाधव छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे नवीन पोलिस अधीक्षक (SP) म्हणून आता प्रकाश जाधव कार्यभार सांभाळणार आहेत. विनय राठोड यांची ठाणे ग्रामीण भागात बदली करण्यात आली आहे. संभाजी कदम यांच्याकडे एटीएस (ATS) पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक (SP) म्हणून धुरा सोपवण्यात आली आहे. विवेक पाटील यांची सीआयडी (CID) पुणे येथे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड, मिरा-भाईंदर आणि विशेष शाखा संजय सरगुंडा पाटील आणि अमोल झेंडे या दोन्ही अधिकाऱ्यांना मिरा-भाईंदर, वसई-विरार (MBVV) आयुक्तालयात पोलिस उपायुक्त (DCP) म्हणून पाठवण्यात आले आहे. विक्रांत देशमुख यांची पिंपरी-चिंचवड येथे बदली करण्यात आली आहे. प्रिती टिपरे यांची अन्न व औषध प्रशासन (FDA) मुंबई येथे सहआयुक्त (Joint Commissioner) म्हणून नियुक्ती झाली आहे. हिंमत जाधव यांच्याकडे पुणे येथील ‘नार्कोटिक्स टास्क फोर्स’ची (अंमली पदार्थ विरोधी पथक) अत्यंत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. चार अधिकाऱ्यांच्या बदल्यांना ऐनवेळी ‘स्थगिती’ गृह विभागाने जारी केलेल्या या आदेशात एक महत्त्वाची बाब नमूद करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव काही अधिकाऱ्यांच्या पूर्वीच्या बदली आदेशांना ऐनवेळी स्थगिती देण्यात आली आहे. यामध्ये कुमार चिंथा, नित्यानंद झा, अकबर पठाण आणि दिपक गिऱ्हे या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश तूर्तास रोखून धरण्यात आले असून, त्यांच्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बदल्यांनंतर आता सर्व नवनियुक्त अधिकारी येत्या दोन ते तीन दिवसांत आपापल्या पदांचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *