Headlines

Nagpur Duo Booked For Rs 6.21 Lakh Fraud



हिंगोली पंचायत समितीमध्ये आऊटसोर्सिंगमधून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 6.21 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या नागपूर येथील दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 26 रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील संगणक प्रशिक्षण केंद्र चालक शरद मोहारे यांची दोन वर्षापूर्वी नागपूर येथील ॲडराईट मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे विरेंद्र वाटकर व जगदिश राऊत यांच्याशी बसस्थानकावर भेट झाली होती. दोघांची चर्चा झाल्यानंतर त्यांनी मोहारे यांना आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून जागा निघालेल्या असून त्यासाठी कोणी ओखळीचे असेल तर सांगा लगेच रुजु होण्याचे आदेश देतो असे सांगितले.

यावेळी मोहारे त्यांनी त्यांचा मुलगा व इतर दोघांसाठी विचारणा केली असता त्यांना हिंगोली पंचायत समितीमध्येच रोजगार हमी योजनेमध्ये टंकलेखक, पर्यवेक्षक व अन्य एक अशा तीन जागांवर नियुक्ती देण्याचे अमिष दाखविले. त्यासाठी पैसे लागतील असे सांगितले. त्यानंतर मोहारे यांनी ता. 31 मार्च 2024 ते ता. 20 ऑक्टोबर 2024 या कालावधीत ऑनलाईन पैसे देखील पाठविले.

दरम्यान, पैसे देऊनही नियुक्तीचे आदेश मिळालेच नाही. त्यामुळे त्यांनी विरेंद्र व जगदिश याच्याशी संपर्क साधून आदेशाची मागणी केली. मात्र लवकरच आदेश मिळतील असे सांगत त्यांनी एक वर्षभर आदेशच दिले नाही. त्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोहारे यांनी पैशाची मागणी केली. तर त्यांनी पैसे देण्यासही टाळाटाळ चालवली होती.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मंगळवारी ता. 26 रात्री हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी विरेंद्र वाटकर, जगदिश राऊत यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संदीप मोदे,सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *