![]()
पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी आणि निवासी सोसायट्यांमध्ये अनधिकृत पशुबळी व कत्तलीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलिस प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवले आहे. मीराभाईंदर परिसरासह पुण्यातील काही भागांमध्ये सार्वजनिक स्वरूपात पशुबळी आणि कत्तलीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्याचे पत्रात नमूद केले आहे. अशा घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असून सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमांसाठी कोणतीही प्रशासकीय परवानगी, आरोग्य विभागाचा परवाना किंवा कायदेशीर प्रक्रिया पाळली जात नसल्याचेही निदर्शनास आले आहे. मिसाळ म्हणाल्या, “पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक सलोखा जपणारे शहर आहे. अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.” राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आपल्या पत्रात काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यात सार्वजनिक ठिकाणी किंवा निवासी सोसायट्यांमध्ये परवानगीविना पशुकत्तल करू नये, अशा प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि पुणे पोलिस, महापालिका आरोग्य विभाग, संबंधित समाजघटक व स्थानिक प्रतिनिधी यांची तातडीची समन्वय बैठक बोलवावी, यांचा समावेश आहे. पक्क्या अनुज्ञप्तीकरिता मासिक दौऱ्याचे आयोजन जूनमध्ये पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे. पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी 2, 3 आणि 4 जून 2026 रोजी खेड, 8, 9 आणि 10 जून रोजी मंचर, 15, 16 आणि 17 जून रोजी जुन्नर, 22, 23 आणि 24 जून रोजी वडगाव मावळ आणि 29 आणि 30 जून 2026 रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी 29 मे 2026 रोजी दुपारी 5 वाजता कोटा उपलब्ध होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.
Source link
सार्वजनिक ठिकाणी पशुबळींवर कारवाई करा:राज्यमंत्री मिसाळ यांची मागणी, पुणे पोलिसांना पत्र