![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. उज्ज्वला योजनेतील अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या कमी करण्यात आल्याचा आरोप करत, निवडणुका संपल्यानंतर सरकार योजनांच्या लाभार्थ्यांवर निर्बंध आणत असल्याचा दावा त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केला. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या आधी 12 वरून 9 आणि नंतर 4 करण्यात आल्याचा दावा केला. उद्या ही योजनाच बंद झाली तरी आश्चर्य वाटणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसेच राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित करत, निवडणुकीत सरसकट लाभ दिल्यानंतर आता विविध निकष लावून लाखो महिलांना योजनेबाहेर काढले जात असल्याचा आरोप केला. पुढील काळात आणखी निकष लावून लाभार्थ्यांची संख्या कमी केली जाऊ शकते, असा दावा करत रोहित पवार यांनी सरकारवर ‘मतांसाठी योजना आणि नंतर लाभांवर कात्री’ अशी टीका केली. निवडणुकांपूर्वी आकर्षक घोषणा करून मतदारांना आश्वासने दिली जातात, मात्र निवडणुका संपल्यानंतर त्या योजनांचे स्वरूप बदलले जाते, असा आरोपही त्यांनी केला. रोहित पवारांची ट्विटर एक्सवरील पोस्ट… संजय राऊतांचे किरीट सोमय्यांना खुले पत्र:’15.15 लाख कोटींच्या घोटाळ्यावर भाजप गप्प का? राजेश एक्सपोर्ट्स प्रकरणी आवाज उठवण्याचे आवाहन राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना खुले पत्र लिहून कथित राजेश एक्सपोर्ट्स घोटाळ्याप्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले आहे. देशभरात गाजत असलेल्या या प्रकरणात तब्बल 15.15 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप होत असताना भाजप आणि केंद्र सरकार मौन का बाळगत आहे, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा
Source link
लाडकी बहीण योजनेवरून रोहित पवार आक्रमक:म्हणाले- उद्या योजना गुंडाळली तरी आश्चर्य नाही, उज्ज्वलातील सिलिंडरची संख्या कमी केल्याचा आरोप