![]()
दैनिक दिव्य मराठीच्या आवाहनाला प्रतिसाद देत बेलपुरा येथील श्री शिवाजी मराठा हायस्कूल, स्टेशन ब्रांचच्या विद्यार्थ्यांनी एकूण २०० झाडांचे रोपटे लावण्यासह त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार केला. आज आषाढी एकादशीच्या पर्वावर शनिवार २५ रोजी पहिल्या टप्प्यात २५ रोपट्यांची लागवड केली. मुख्याध्यापक संदीप इंगोले यांच्या नेतृत्वात ही वृक्ष लागवड करण्यात आली. दिव्य मराठीने (दैनिक भास्कर समुह) देशभरात ७५ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प घेतला असून याच अनुषंगाने शहरातही दैनिक दिव्य मराठीद्वारे सातत्याने विविध संस्था, शाळा, महाविद्यालय शासकीय कार्यालयांद्वारे वृक्षारोपण करावे असे आवाहन करण्यात आले आहे. श्री शिवाजी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वड, पिंपळ, कडुनिंब, कडू बदाम या वृक्षांच्या रोपट्यांची लागवड केली. याप्रसंगी मुख्याध्यापक इंगोले यांच्यासह प्राची काळे, अरुणा मार्डीकर, गोपाल काळमेघ, पी.एच.केचे, सुनील भोयर, किशोर निर्मळ, अभिजीत देशमुख, स्वर्गे, अनिल भराडे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित होते.
Source link
विद्यार्थ्यांनी दोनशे रोपटे लावण्याचा केला निर्धार:श्री शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये घेतला उपक्रम