- Marathi News
- National
- ‘Vantara University’ Dedicated To Wildlife And Veterinary Science Launched, World’s First Integrated Global University In Jamnagar
जामनगर12 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांची जागतिक वन्यजीव संरक्षण संस्था, ‘वनतारा’ ने जामनगरमध्ये ‘वनतारा युनिव्हर्सिटी’ सुरू करण्याची घोषणा केली. वन्यजीव संरक्षण व पशुवैद्यकीय शास्त्र यांना समर्पित ही जगातील पहिले एकात्मिक जागतिक विद्यापीठ असेल, ज्याचा पाया प्राणी कल्याण, वैज्ञानिक प्रगती आणि करुणा यावर आधारित आहे.
याप्रसंगी अनंत म्हणाले, ‘संरक्षणाचे भविष्य आपण लोक आणि संस्थांना करुणा, ज्ञान व कौशल्यासह जीवांची सेवा करण्यासाठी कसे तयार करतो यावर अवलंबून असेल. वनतारा युनिव्हर्सिटीची संकल्पना त्या वैयक्तिक अनुभवातून आली आहे, जेव्हा मी संकटातील प्राण्यांना जवळून पाहिले आणि त्यांच्या देखभालीसाठी अधिक क्षमतेची गरज जाणवली.’ ते पुढे म्हणाले, ‘ही संस्था नालंदा विद्यापीठाची भावना आणि ‘आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः’ (सर्व दिशांकडून आम्हाला श्रेष्ठ विचार प्राप्त होवोत) या आदर्शाने प्रेरित आहे. प्रत्येक जीव वाचवण्यासाठी समर्पित असलेली नवीन पिढी तयार करणे हे याचे ध्येय आहे.’ या विचाराचे प्रतीकात्मक दर्शन घडवण्यासाठी भूमिपूजन स्थळाच्या डिझाइनमध्ये दोन बिजोलिया वाळूच्या दगडांचा समावेश करण्यात आला. हे दगड प्राचीन विंध्य भूरचनेतून घेण्यात आले आहेत, जे प्राचीन नालंदा विद्यापीठाच्या भौगोलिक रचनेशी संबंधित मानले जातात. हे भारताच्या ज्ञान व शिक्षणाच्या अखंड परंपरेचे प्रतीक आहेत.
विशेष कोर्सेस : ही युनिव्हर्सिटी वन्यजीव औषध व शस्त्रक्रिया, प्राणी पोषण आणि वर्तन शास्त्र, जेनेटिक्स, एपिडेमियोलॉजी आणि ‘वन हेल्थ’, संवर्धन धोरण यासारख्या विषयांवर यूजी, पीजी, फेलोशिप व विशेष उपक्रम चालवेल. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाईल. प्रगत क्लिनिकल पायाभूत सुविधा व आंतरराष्ट्रीय सहकार्यासह, हा निवासी परिसर शोध-आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करेल.
भूमिपूजनात भारताची ज्ञान परंपरा आणि जैवविविधतेचा अनोखा संगम
हिंदू परंपरेनुसार भव्य भूमिपूजन सोहळ्यात शिक्षण, विज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील दिग्गजांसह अनंत अंबानींचे शिक्षक आणि मार्गदर्शक उपस्थित होते. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून आणलेली माती, पाणी आणि दगड विधिवत स्थापित करणे हे होते. हे घटक भारताच्या समृद्ध जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करतात. हिमालयीन क्षेत्र, गवताळ प्रदेश, जंगले, दलदलीचा प्रदेश आणि कोरड्या परिसंस्थेसारख्या विविध भौगोलिक भागांतून हे साहित्य गोळा करण्यात आले होते. देशाचा अफाट वारसा आणि विविधता दर्शवण्यासाठी या नैसर्गिक घटकांचा प्रतीकात्मक वापर करण्यात आला.